शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भावेश जांबावलीकर यांचा भाजपाचा राजीनामा; नवनाथ नाईकही मगोच्या वाटेवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 17:11 IST

रिवण मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवर जांबवलीकर व नाईक या दोघांनीही दावा केला होता. मात्र त्या दोघांना डावलून ही उमेदवारी सुरेश केपेकर यांना देण्यात आली, त्यामुळे या दोघांनीही बंडाचे निशाण फडकविले आहे.

मडगाव: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या उमेदवारी वरुन सध्या गोव्यात भाजपात बंडाळी माजली असून रिवण मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी नाकारल्याने युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भावेश जांबावलीकर यांनी बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. दुसर्‍या बाजूने विद्यमान दक्षिण जिल्हा पंचायत अध्यक्ष नवनाथ नाईक यांनीही भाजपला रामराम ठोकून मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

रिवण मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवर जांबवलीकर व नाईक या दोघांनीही दावा केला होता. मात्र त्या दोघांना डावलून ही उमेदवारी सुरेश केपेकर यांना देण्यात आली, त्यामुळे या दोघांनीही बंडाचे निशाण फडकविले आहे. यातील जांबावलीकर यांनी आपण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार हे जाहीर केले आहे. त्यांचे बंड थोपविण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही प्रयत्न केला. मात्र आपण आपला निर्णय बदलणार नाही हे त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले.

जांबावलीकर हे १९९८ पासून भाजपाचे कार्यकर्ते असून युवा मोर्चासाठीही त्यांनी गोव्यात भरीव काम केले आहे. यंदा रिवण मतदारसंघ सर्व साधारण उमेदवारसाठी खुला असल्याने ही उमेदवारी मलाच मिळणार याची मला खात्री  होती . मागच्यावेळी पक्ष नेत्यांनी मला टीएएसई आश्वासनही दिले होते पण शेवटच्या क्षणी माझे नाव गाळले गेले असे जांबावलीकर यांनी संगितले.

दुसर्‍या बाजूने नवनाथ नाईक यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना, मी मतदारसंघात केलेले काम पाहून तरी मला उमेदवारी द्यायला हवी होती असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, मला उमेदवारी न दिल्यास ती जांबावलीकर यांना द्यावी असे मी पक्षाला संगितले होते पण माझी तीही मागणी एकूण घेतली गेली नाही. त्यांना मगोची ऑफर आहे का असे विचारले असता ऑफर आहे पण मी अजून निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांना विचारूनच मी शेवटचा निर्णय घेईन असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवा