शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने लावली स्वत:च्या मंत्र्यांची फिल्डिंग, माजी मुख्यमंत्र्यांचीही वेगळी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 12:27 IST

पणजी : गोव्यातील भारतीय जनता पक्षात सध्या दोन गट कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या गटाने आपण भाजपच्या येथील कार्यालयात सातत्याने बसणार असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपाच्या पक्ष संघटनेने वेगळे धोरण स्वीकारले आहे.

पणजी : गोव्यातील भारतीय जनता पक्षात सध्या दोन गट कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या गटाने आपण भाजपच्या येथील कार्यालयात सातत्याने बसणार असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपाच्या पक्ष संघटनेने वेगळे धोरण स्वीकारले आहे. पक्ष संघटनेने आपल्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांना आठवड्याचा एक दिवस भाजप कार्यालयात बसण्याची सक्ती केली आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यासह प्रत्येक मंत्री कार्यालयात बसतीलच अशी फिल्डींग पक्षाच्या संघटनेने लावली आहे.

माजी मुख्यमंत्री पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई इतरांचा मिळून भाजपमध्ये एक गट आहे. नोकरभरती रद्द करण्याच्या विषयावरून या गटाचा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्याशी पहिला संघर्ष झाला. या गटाची नुकतीच एक गुप्त बैठकही झाली. भाजपची पक्ष संघटना आपल्याला डावलू पाहते अशी भावना झाल्यानंतर आपण दर सोमवारी पणजीत येऊन भाजपच्या कार्यालयात बसेन व कार्यकर्त्यांना भेटेन, असे माजी मुख्यंमत्री पार्सेकर यांनी जाहीर केले.गोव्यात पार्सेकर हे भाजपचे दोनवेळा प्रदेशाध्यक्ष होते आणि फेब्रुवारी 2017 मधील निवडणुकीत भाजपचा पराभव होईपर्यंत पार्सेकर हे मुख्यमंत्रिपदी होते. मात्र आता मुख्यमंत्री पर्रीकर यांनीच पूर्ण पक्षावर नियंत्रण प्राप्त केले व सगळे पराभूत बाजूला पडले अशी स्थिती निर्माण झाली. पार्सेकर यांनी या सगळ्य़ा पार्श्वभूमीवर दर सोमवारी पक्ष कार्यालयात येऊन बसणो सुरू केले आहे. दुस:याबाजूने भाजपच्या पक्ष संघटनेने पक्षाच्या सर्व मंत्र्यांना आठवडय़ाला एक दिवस कार्यालयात येऊन बसा असा फतवा जारी केला. त्यानुसार आरोग्य मंत्री विश्वजित राणो हे शनिवारी पक्ष कार्यालयात दोन तास येऊन बसले व त्यांनी कार्यकत्र्याचे म्हणणो ऐकून घेतले. विद्यमान सरकार हे आघाडीचे असल्याने आघाडीच्या घटक पक्षांचेच जास्त ऐकले जाते, आमचे कुणी ऐकत नाही अशी भाजपच्या कार्यकत्र्याची भावना झालेली आहे. मात्र आता मंत्री पक्षाच्या कार्यालयांमध्ये खास भाजपच्याच कार्यकत्र्याना भेटण्यासाठी बसू लागल्याने ही भावना दूर  होण्यास मदत होईल, असे पक्षाच्या काही पदाधिका-यांना वाटते.

येत्या आठवडय़ात वीज मंत्री पांडुरंग मडकईकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक हे पक्ष कार्यालयात बसणार आहेत. भाजपच्या सर्व कार्यकत्र्यांनी यापुढे सचिवालयात किंवा मंत्रलयात जाऊन लोकांच्या गर्दीमध्ये स्वपक्षीय मंत्र्यांना भेटण्यासाठी धडपड करू नये, त्याऐवजी पक्ष कार्यालयात येऊन भेटावे, अशी सूचना पक्ष संघटनेने गोवाभरातील आपल्या कार्यकत्र्याना केली आहे. आपल्या भागात कोणत्या सार्वजनिक समस्या आहेत, त्यात सुधारणा कशी व्हायला हवी याविषयी कार्यकत्र्यानी मंत्र्यांशी चर्चा करणो व मंत्र्यांनी त्यावर तोडगा काढणो अपेक्षित आहे, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर