भाजप लागला निवडणूक कामाला

By Admin | Updated: January 4, 2016 01:33 IST2016-01-04T01:33:34+5:302016-01-04T01:33:44+5:30

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कामाला लागला असून पक्षाच्या प्रदेशअंतर्गत संघटनात्मक

BJP took the election to work | भाजप लागला निवडणूक कामाला

भाजप लागला निवडणूक कामाला

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कामाला लागला असून पक्षाच्या प्रदेशअंतर्गत संघटनात्मक निवडणुकांचे काम जोरात सुरू आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड दि. १६ रोजी होईल. सोमवार, दि. ४ पासून मतदारसंघ मंडळ समित्यांची निवड होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १,६00 पैकी १,२00 बुथवर समित्या स्थापन झाल्या आहेत. दोन्ही जिल्हाध्यक्षांची निवड १५ रोजी होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात ४0 बुथ समित्या असतात. एका बुथवर १0 जणांची समिती असते. मतदारसंघातील बुथवरील ४00 पदाधिकारी मंडळ अध्यक्ष तसेच इतर ३0 मिळून ३१ जणांची निवड करीत असतात. ही प्रक्रिया आजपासून सुरू होत असून पहिला मंडळ अध्यक्ष सोमवारी सावर्डे मतदारसंघातून निवडला जाईल. दि. ५ रोजी साळगाव, पर्ये, मये आणि कुडचडे मतदारसंघात. दि. ६ रोजी थिवी, साखळी, मांद्रे व काणकोण मतदारसंघात. दि. ७ रोजी पेडणे, सांगे व हळदोणे मतदारसंघात मंडळ समित्यांची निवड होईल. या मंडळ समित्यांचा २0१६ ते २0१८ असा तीन वर्षांचा कार्यकाळ असेल. दि. १४ पर्यंत ही प्रक्रिया संपणार आहे. केंद्रातून त्यासाठी पक्षाचा खास निवडणूक अधिकारी येणार आहे. पक्षाचे गोवा प्रभारी पुरुषोत्तम रूपाला, संघटनप्रमुख बी. एल. संतोष, निवडणूक प्रमुख अविनाश खन्ना या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: BJP took the election to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.