भाजपने विरोधकांचा आदर करावा

By Admin | Updated: May 31, 2014 01:35 IST2014-05-31T01:32:00+5:302014-05-31T01:35:36+5:30

मडगाव : श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक व फा. सेड्रिक प्रकाश हे दोघेही एकाच तºहेचे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जे वक्तव्य केले आहे,

BJP should respect the opponents | भाजपने विरोधकांचा आदर करावा

भाजपने विरोधकांचा आदर करावा

मडगाव : श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक व फा. सेड्रिक प्रकाश हे दोघेही एकाच तºहेचे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याला कॅथॉलिक असोसिएशन आॅफ गोवा या संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. या विधानाबद्दल खंतही व्यक्त केली आहे. कॅथॉलिक असोसिएशनच्या वतीने एडवीन पिंटो यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात भाजपाचा लोकसभेचा प्रचार हा गुजरात मॉडेलवर आधारित असल्याने व गुजरातेत बराच काळ वास्तव्य करून असणारे फा. प्रकाश यांना आपले अनुभव गोव्यात येऊन सांगावेसे वाटले. लोकशाहीत विरोधकांच्या मतांचाही आदर करणे आवश्यक आहे, असा सल्ला देताना भाजपाने या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवूनही ६९ टक्के मतदारांनी भाजपाला मतदान केले नाही, याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी ठेवावी, असे या पत्रकात म्हटले आहे. फा. प्रकाश यांनी केवळ आपले अनुभव कथन केले आहेत. त्यांची तुलना आपली स्वत:ची मते दुसर्‍यावर लादणार्‍या आणि संस्कृतीच्या नावावर लोकांवर हल्ले करणार्‍या प्रमोद मुतालिक यांच्याशी करणे योग्य नव्हे, असे पिंटो यांनी म्हटले आहे. फा. प्रकाश यांनी केवळ आपले अनुभव कथन केले आहेत. त्यांची तुलना आपली स्वत:ची मते दुसर्‍यावर लादणार्‍या आणि संस्कृतीच्या नावावर लोकांवर हल्ले करणार्‍या प्रमोद मुतालीकशी करणे योग्य नव्हे असे पिंटो यांनी म्हटले आहे. पर्रीकर यांनी फा. प्रकाश यांचे वक्तव्य हिंसाचाराला खतपाणी घालणारे होते तसेच कित्येक खोट्या गोष्टीही फा. प्रकाश यांनी सांगितल्या असे मत व्यक्त केले आहे. या गोष्टी नेमक्या कुठल्या हे पर्रीकरांनी जाहीर करावे, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP should respect the opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.