शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

SITने हडप केलेल्या जागा भाजपचे मंत्री, आमदार विकतात; 'आप'च्या अमित पालेकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:32 IST

आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांची पत्रकार परिषद

नारायण गावस, पणजी: सरकार जे एसआयटी मार्फत जमिनी ताब्यात घेत आहेत ते भाजपचे काही मंत्री आमदार विकण्याचे काम करत आहेत. भाजपच्या एका आमदारांने आसगाव येथे अशी जमीन विकत घेतली आहे. त्याचा योग्य पुरावा आमच्याकडे आहे याेग्य वेळ आल्यावर तो जाहीर केला जाणार आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषेदत केला. यावेळी त्याच्यासोबत वाल्मिकी नाईक व जॉर्सन गोमस् उपस्थित होते.

ॲड पालेकर म्हणाले अगाेदर बिल्डर लोकांच्या जागा हडप करत होते. आता सरकारचे मंत्री आमदारच लाेकांच्या जागा हडप करत आहेत. एसआयटीने ताब्यात घेतलेल्या जमिनी परस्पर विकल्या जात आहेत. यासाठी सरकार नवनवीन कायदे आणत आहेत. नुकतेचआयपीबी विधेयक भाजपने मांडले. हे विधेयक आले तर सरकारच्या सर्व खात्याचे अधिकार काढून ते सर्व मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. नंतर मुख्यमंत्री आपल्या दलालासोबत राज्यातील सर्व जागा या रियल इस्टेट तसेच बिल्डरांना विकणार आहे. विधानसभेत विरोधकांनी या विधेयकाला विरोध केल्याने ते चिकित्सा समितीकडे पाठविले आहे. हे विधेयक आले तर गाेव्याच्या जमिनी नष्ट हाेणार आहे.

ॲड. पालेकर म्हणाले, नगर नियोजन, पंचायत, साधन सुविधा विकास मंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, पंचायत या सर्वांना बाजूला ठेऊन सर्व अधिकार गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऑफ सिंगल विंडो क्लिअरन्स विधेयकाकडे जाणार आहे. याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असणार तसेच सदस्य हे मुख्यमंत्र्याच्या जवळचे असणार. या विधेयकामुळे प्रकल्पांना स्थानिक लोकांना तसेच पंचायतीला विराेध करता येणार नाही. त्यामुळे हे विधेयक खूप घातक आहे. सरकारचा डोळा फक़्त गाेव्याच्या जमिनी हडप करणे आहे हे या अधिवेशनात दिसून आले, असे ते म्हणाले.

वाल्मिकी नाईक म्हणाले, सरकार फक्त जनहित विरोधी विधेयक आणून राज्यातील जमिनी लुटण्याचा प्रयत्न करत आहे. पण या ३३ आमदारांना ७ विरोधी आमदारांनी धडा शिकवला. त्यांनी विरोध केल्याने सरकार अशी नको असलेली विधेयक मंजूर करु शकली नाही. सरकार फक़्त राज्यातील जमिनी नष्ट करु पाहत आहेत हे दिसून आले. पण या अधिवेशनात खरोखरच आपचे आमदार तसेच इतर विरोधी आमदारांनी चांगली कामगिरी केली. सरकारचे विविध भ्रष्टाचार तसेच अन्य कारनामे विधानसभेत मांडले हीच खारी लाेकशाही आहे, असे ते म्हणाले.वाल्मिकी म्हणाले मुख्यमंत्री डॉ. प्रमाेद सावंत यांनी अधिवेशनात प्रत्येक वेळी आपचे अध्यक्ष व दिल्लीचे आमदार अरविंद केजरीवाल यांच्यावर काही आरोप केले आहेत त्याचा आम्ही पक्षातर्फे निषेध करता.

टॅग्स :goaगोवाAAPआपBJPभाजपा