भाजप नेत्यांबाबत संघ निर्णय घेत नाही!

By Admin | Updated: May 16, 2014 01:06 IST2014-05-16T01:00:03+5:302014-05-16T01:06:54+5:30

पणजी : भारतीय जनता पक्षाच्या कुठच्या नेत्याने राज्यस्तरावरील राजकारणात भाग घ्यावा आणि कुठच्या नेत्याने राष्ट्रीय राजकारणात भाग घ्यावा, याविषयीचा निर्णय देशभर संघाचे नेते घेतात

BJP leaders do not decide on the decision! | भाजप नेत्यांबाबत संघ निर्णय घेत नाही!

भाजप नेत्यांबाबत संघ निर्णय घेत नाही!

पणजी : भारतीय जनता पक्षाच्या कुठच्या नेत्याने राज्यस्तरावरील राजकारणात भाग घ्यावा आणि कुठच्या नेत्याने राष्ट्रीय राजकारणात भाग घ्यावा, याविषयीचा निर्णय देशभर संघाचे नेते घेतात, अशी हवा अलीकडे निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे देखील राष्ट्रीय राजकारणात जातील, अशा प्रकारची चर्चा अधूनमधून होत असते; पण गोव्यातील संघ पदाधिकार्‍यांनी किंवा एकूणच संघाने मात्र पर्रीकर यांना त्या विषयीचा कोणताच सल्ला दिलेला नाही, अशी माहिती मिळाली. स्वत: पर्रीकर यांनी आपण राष्ट्रीय राजकारणात जाणार नाही व आपल्याला दिल्लीला कुणी बोलावलेलेही नाही, असे बुधवारी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर या प्रतिनिधीने गुरुवारी गोवा प्रांताचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपचे निर्णय संघ कधीच घेत नाही. पर्रीकर यांनी दिल्लीच्या राजकारणात जावे की गोव्यातच राहावे, हे संघ कधीच सांगणार नाही. देशाच्या उर्वरित भागांतही संघ कधी भाजपच्या नेत्यांना हे करा व ते करू नका, असे सांगत नाही. तशा प्रकारच्या बातम्या दिल्लीहून येतात; पण त्यात तथ्य नाही. जणू काही संघच भाजप चालवतोय, अशी हवा तयार केली जाते ती चुकीची आहे. भाजपने स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावेत. आम्ही कधी हस्तक्षेप करणार नाही. (खास प्रतिनिधी)

Web Title: BJP leaders do not decide on the decision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.