भाजपकडे आठ पालिका
By Admin | Updated: October 28, 2015 02:11 IST2015-10-28T02:11:03+5:302015-10-28T02:11:12+5:30
पणजी : अकरापैकी सहा नगरपालिकांत स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या भाजपाने आणखी दोन ठिकाणी सत्तारूढ होण्याचा दावा केला असला, तरी काही मातब्बर उमेदवारांचा पराभव करत शहरी

भाजपकडे आठ पालिका
पणजी : अकरापैकी सहा नगरपालिकांत स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या भाजपाने आणखी दोन ठिकाणी सत्तारूढ होण्याचा दावा केला असला, तरी काही मातब्बर उमेदवारांचा पराभव करत शहरी मतदाराने भाजपाला सावधानतेचा इशाराही दिलेला आहे. मडगाव, वाळपई, केपे इथला दारूण पराभव सत्ताधारी पक्षाच्या जिव्हारी लागण्यासारखा असून काणकोण व कुंकळ्ळी पालिकेत तडजोडीचे राजकारणच पक्षाला मदत करू शकेल. पेडणे, डिचोली, म्हापसा, सांगे, कुडचडे आणि मुरगाव या नगरपालिकांत मात्र पक्षाने निर्विवाद वर्चस्व संपादित केले आहे. क्षीण झालेली काँग्रेस आणि पूर्णपणे विखुरलेला विरोधी पक्ष अशी परिस्थिती असताना अकराही पालिका ताब्यात घेणे राज्यातल्या सत्ताधारी पक्षाला जमलेले नाही, ही बाबही बोलकी असल्याचे मानले जाते.
राज्यातील अकरा नगरपालिकांच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. अकरापैकी सहा पालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. उर्वरित दोन पालिकांमध्ये भाजपकडून अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने सत्ता स्थापन केली जाणार आहे. आठ पालिकांमध्ये आमचेच नगराध्यक्ष
असतील, असा विश्वास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी निकालानंतर व्यक्त केला. विरोधी काँग्रेस पक्ष मात्र या निवडणुकीत निष्प्रभ ठरला. रविवारी अकरा पालिकांसाठी मतदान झाले होते. भाजपने आपली पूर्ण शक्ती पालिका (पान २ वर)