शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Veer Savarkar: “वीर सावरकरांनी अंदमानात खऱ्या काळ्यापाण्याची शिक्षा भोगलीय, असे वाद चुकीचे”: देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 16:29 IST

Veer Savarkar यांच्याबद्दलचे वाद चुकीचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पणजी: स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून मोठी विधाने केली जात असल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वीर सावरकराच्या संसदेत लावलेल्या तसबिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यातच एका पुस्तक प्रकाशनावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर आता भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचे वाद चुकीचे आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. (Devendra Fadnavis on Veer Savarkar)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर असून, पणजी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आताच्या घडीला सुरू असलेल्या वीर सावरकर यांच्या दया याचिकेच्या विधानांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळात अनेकांचे अर्ज तयार केले होते. पण स्वत: केला नाही. त्यांना जेव्हा आग्रह झाला आणि सांगण्यात आले त्यावेळी त्यांनी अर्ज केला. हा इतिहासाचा भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वांत जास्त काळ आणि सर्वांत अडचणीच्या काळात सेल्युलर जेलमध्ये होते. खरी काळ्या पाण्याची शिक्षा ज्या लोकांनी भोगली. त्यापैकी सावरकर एक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल निर्माण केलेले वाद चुकीचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

त्याचा अर्थ सावरकरांनी माफी मागितली असा होत नाही

वीर सावरकरांबद्दल शिवसेनेची कायम तीच भूमिका राहिली आहे. वीर सावरकर आमचे आदर्श आहेत. मोहन भागवत आणि संघाला सावरकरांविषयी प्रेम आले आहे. त्याचेही आम्ही स्वागत करतो, असे सांगत राजकारण, तुरुंगवासात असताना काहीवेळा रणनीती ठरवावी लागते. दहावर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात काढल्यानंतर बाहेर येऊन कार्य करावे, असे वाटते. अशा परिस्थितीत जगभरात तुरुंगाबाहेर पडण्याचे जे मार्ग आहेत, तो मार्ग अवलंबला. म्हणून त्याचा अर्थ सावरकरांनी माफी मागितली असा होत नाही, असे संजय राऊत यांनी नमूद केले.

दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, अंदमानच्या तुरुंगात कैद असताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच वीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका दाखल केली होती, असे म्हटले आहे. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा