दक्षिणेत वर्चस्वासाठी भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ

By Admin | Updated: October 23, 2015 02:03 IST2015-10-23T02:02:33+5:302015-10-23T02:03:09+5:30

मडगाव : पालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा शुक्रवारी शेवटचा दिवस असून सांगे, कुंकळ्ळी व कुडचडे या तीन पालिकांवर भाजपाचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे. मडगाव,

BJP-Congress bout for south-east | दक्षिणेत वर्चस्वासाठी भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ

दक्षिणेत वर्चस्वासाठी भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ

मडगाव : पालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा शुक्रवारी शेवटचा दिवस असून सांगे, कुंकळ्ळी व कुडचडे या तीन पालिकांवर भाजपाचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे. मडगाव, काणकोण व केपे या तीन पालिका आपल्या सत्तेखाली आणण्यासाठी भाजपाला धडपड करावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. ही निवडणूक भाजपने आपल्या प्रतिष्ठेची केल्याने तिच्याकडे विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे.
गुरुवारी दसऱ्याचा सण असतानाही मडगावात उमेदवार आणि नेत्यांनी प्रचारावर भर दिला. आमदार विजय सरदेसाई व दिगंबर कामत यांनी गुरुवारीही काही उमेदवारांसह घरोघरी फिरून प्रचार केला. तर भाजपाचे दामू नाईक हेही प्रचारात सक्रिय झाले होते. खासदार नरेंद्र सावईकर व प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही आपला मुक्काम दक्षिण गोव्यातच ठोकला होता. तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रात्री उशिरा मडगावात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी गोव्यातील ११ पैकी किमान ९ पालिकांवर भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला. मडगाव व केपेतही भाजपाला अनुकूल वातावरण आहे, असे ते म्हणाले.मात्र, आमदार विजय सरदेसाई यांनी तेंडुलकर यांचा हा दावा खोडून काढताना काँग्रेस व अपक्ष आमदारांनी पुढे आणलेले मडगाव सिव्हीक अलायन्सचेच नगरमंडळ मडगाव पालिकेत स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. आतापर्यंत मडगावच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस गोटात आश्वस्त वातावरण असून २५ पैकी किमान १३ जागा ही आघाडी जिंकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. मात्र, भाजपप्रणित मडगाव विकास आघाडीचे निमंत्रक दामू नाईक यांनाही आपलेच पॅनल सत्ता स्थापन करेल असे वाटते. मात्र, मडगावात भाजपाला बंडखोरीचा बराच त्रास सहन करावा लागणार आहे.
कुंकळ्ळीत सुरुवातीला भाजपाच्या विरोधात वातावरण होते. मात्र, काँग्रेसचेच नेते आपसात भांडत असल्यामुळे त्याचा फायदा भाजपाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सांगेत आमदार सुभाष फळदेसाई यांचा पाठिंबा असलेली आघाडी एखाद दुसरा अपवाद वगळता पूर्ण क्षमतेने सत्तेवर येण्याची शक्यता
आहे. कुडचडेतही आमदार नीलेश काब्राल यांनी बऱ्यापैकी मांड ठोकल्याने याही पालिकेत भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP-Congress bout for south-east

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.