बिस्मार्क यांचा बुडून मृत्यू?
By Admin | Updated: November 8, 2015 02:25 IST2015-11-08T02:25:41+5:302015-11-08T02:25:53+5:30
पणजी : गुरुवारपासून बेपत्ता असलेले सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण चळवळीतील बिनीचे शिलेदार फा. बिस्मार्क डायस

बिस्मार्क यांचा बुडून मृत्यू?
पणजी : गुरुवारपासून बेपत्ता असलेले सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण चळवळीतील बिनीचे शिलेदार फा. बिस्मार्क डायस यांचा मृतदेह शनिवारी त्यांच्या सांतइस्तेव्ह गावाजवळील मांडवी नदीत तरंगताना आढळला. डायस यांचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
फा. बिस्मार्क यांचे निधन पाण्यात बुडून झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून निष्पन्न झाल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. मात्र, पट्टीचे पोहणारे असलेल्या बिस्मार्क यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता तर नाही ना, याचीही पोलिसांनी कसून तपासणी करावी, अशी मागणी सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्त्यांतून होत आहे. फा. बिस्मार्क यांच्या कुटुंबीयांनीही तशीच मागणी केली आहे.
बड्या कंपन्यांना शिंगावर घेणारे फा. बिस्मार्क बेपत्ता झाल्यापासून स्थानिकांतर्फे त्यांचा शोध जारी होता. आपल्या दोन मित्रांसह शुक्रवारच्या मध्यरात्रीपर्यंत ते जिथे बसले होते, त्याच स्थळी शोध घेताना सांतइस्तेव्ह क्षेत्रातील ‘बाभळ’ येथील मानशीपासून २० मीटरच्या अंतरावर त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सापडलेल्या या मृतदेहाविषयी स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना खबर दिली. जुने गोवे पोलिसांनी मृतदेह ताब्यात (पान २ वर)