शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

300 वैद्यकीय आस्थापनातील कचरा ठरला मडगाव पालिकेसाठी नवी डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 14:46 IST

मडगावातील सुमारे 300 वैद्यकीय आस्थापनांकडून तयार होणारा वैद्यकीय कचरा ही नवीन डोकेदुखी बनली आहे.

मडगाव - व्यावसायिकदृष्टय़ा गोव्यातील सर्वात गजबजलेले शहर असलेल्या मडगावात एकाबाजूने पालिकेसाठी सुक्या कचऱ्याचे डोंगर हा डोकेदुखीचा विषय बनलेला असतानाच मडगावातील सुमारे 300 वैद्यकीय आस्थापनांकडून तयार होणारा वैद्यकीय कचरा ही नवीन डोकेदुखी बनली आहे. मडगावात 47 इस्पितळे असून दवाखान्यांचीही संख्या 252 एवढी प्रचंड आहे.  या 299 वैद्यकीय आस्थापनात तयार होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची कुठलीही सोय पालिकेकडे नसल्याने या कचऱ्याचे करावे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे.  

वास्तविक वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट त्या त्या आस्थापनाने स्वत: लावायची असतानाही मडगावातील इस्पितळे एकतर हा कचरा सुक्या कचऱ्यात मिसळून पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करतात किंवा सरळ उघड्यावर टाकून देतात हे लक्षात आले आहे. दोन दिवसांपूर्वी मोतीडोंगर भागात एका दवाखान्याचा कचरा एका गोणीत भरुन झुडपात टाकून दिल्याचे दिसून आल्यानंतर या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फुटली होती.

मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या कचऱ्याचे कसे व्यवस्थापन करता येईल याची चर्चा करण्यासाठी बैठक झाली. सध्या मुरगाव नगरपालिका आणि पणजी महानगरपालिका एका एजन्सीद्वारे त्या त्या शहरातील वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे. या दोन्ही पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सध्या आम्ही संपर्क साधला आहे. ते कशारितीने हा कचरा हाताळतात त्याची माहिती मागितली आहे. त्याशिवाय ज्या एजन्सीकडून हे काम केले जाते त्या एजन्सीचीही माहिती मागितली असल्याचे नाईक यांनी सांगितले.

सध्या गोव्यात केवळ पणजी व मुरगाव या दोनच ठिकाणी वैद्यकीय कचऱ्याची पालिकेमार्फत विल्हेवाट लावली जाते. गोव्यातील वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी फोंडा तालुक्यातील कुंडई येथे नवीन प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. मात्र हा प्रकल्प उभा होण्यास आणखी किमान दोन वर्षे जातील. त्या अवधीत गोव्यातील सर्व पालिकांसाठी हा वैद्यकीय कचरा डोकेदुखी बनणार आहे.

दरम्यान, असा वैद्यकीय कचरा नगरपालिका कामगारांसाठीही घातक ठरु शकतो. या  कचऱ्याशी कामगारांचा संपर्क आला तर त्यांना साथीचे रोग होऊ शकतात. त्यामुळे वैद्यकीय आस्थापनांनी अशा निष्काळजीपणे हा कचरा फेकून देऊ नये असे आवाहन नाईक यांनी केले आहे. ते म्हणाले, गांधी मार्केटातील खाटीक सुद्धा आपला कचरा व्यवस्थित वर्गीकृत करुन पालिकेकडे देतात. जर खाटीक अशी काळजी घेत असतील तर डॉक्टरांनीही ती घ्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नgoaगोवा