भामट्याकडून कोट्यवधींचा गंडा
By Admin | Updated: December 6, 2015 01:43 IST2015-12-06T01:42:34+5:302015-12-06T01:43:03+5:30
पणजी : वर्षाकाठी ९६ टक्के व्याजाने पैशांची परतफेड करण्याचे आश्वासन देऊन पणजीत एका तोतया खाणमालकाने

भामट्याकडून कोट्यवधींचा गंडा
पणजी : वर्षाकाठी ९६ टक्के व्याजाने पैशांची परतफेड करण्याचे आश्वासन देऊन पणजीत एका तोतया खाणमालकाने कोट्यवधी रुपयांना गंडविल्याबाबत आर्थिक गुन्हा विभागात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गोड बोलून फसविणाऱ्या आज्जू नामक तोतयाने १२ जणांना लुबाडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली; परंतु सध्या चार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
उच्चशिक्षित आणि विदेशात मोठी पदे भूषवून निवृत्त झालेली माणसे या भामट्यांच्या आमिषांना कशी बळी पडतात, याचे उदाहरण देणारी ही चारही प्रकरणे आहेत. यात गुंतवणूकदारांनी संशयिताचे पूर्ण नाव व पत्ता याचीही शहानिशा न करता पैसे गुंतविले. या प्रकरणात ८ टक्के प्रतिमहा आणि ९६ टक्के वार्षिक व्याजाने परतफेड करण्याच्या आमिषाला भुललेल्या नेरूल येथील पॉल साल्ढाणा यांनी आपली जन्मभराची कमाई घालविली. त्यांना ४२ लाखांना गंडा घालण्यात आला.
एक महिना झाल्यावर व्याजाने परतफेडीची अपेक्षा करणाऱ्या पॉल
यांना पैसे मिळाले नाहीतच; परंतु करार शुल्काच्या नावाने अतिरिक्त २८.२०
लाख रुपये त्यांच्याकडून घेऊन भामट्याने एकूण ७५.९८ लाखांना गंडविले, असे तक्रारीत म्हटले आहे.
दुसऱ्या प्रकरणात पाटो-पणजी येथील मारिया एलिझाबेथ या महिलेकडील सोने घेऊन तिला ८.४५ लाख रुपयांना
गंडविले, असे तक्रारीत म्हटले आहे. संशयिताने या महिलेला काही महिन्यांसाठी ९ हजार रुपये फेडले; परंतु नंतर ते बंदच केले. शिवाय तिच्याकडील सोने एका बँकेमध्ये ठेवून तिच्या नावाने कर्जही
उचलले, असे तक्रारदाराचे म्हणणे
आहे. याच तक्रारदाराची आई बॅझील मास्कारेन्हस हिच्याकडून अशाच प्रकारे
८.४५ लाख रुपये उकळल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. (प्रतिनिधी)