शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

काँग्रेसला सासष्टीत मोठी आघाडी अशक्य; मुख्यमंत्र्यांनी मांडला हिशेब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2024 07:21 IST

पल्लवी धेंपे २५ हजार मतांनी जिंकतेय

सद्‌गुरू पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सासष्टी तालुक्यात काँग्रेसला फक्त ४० हजार मतांची आघाडी मिळेल. याहून जास्त आघाडी मिळणार नाही, असा हिशेब मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल खास 'लोकमत'शी बोलताना मोडला. तसेच भाजपच्या उमेदवार पल्लवी धेपे ह्या २५ हजार मतांची आघाडी घेऊन जिंकतात याचा पूर्ण विश्वास आपल्याला आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंत हे डेहराडून येथे खासगी दौऱ्यावर गेले आहेत. तिथून गोव्याच्या राजकीय विषयांवर 'लोकमत'शी ते सविस्तर बोलले. मुख्यमंत्री म्हणाले की, 'सासष्टीत काँग्रेसला साठ हजार मतांची लिड मिळणारच नाही. फक्त ४० हजार मतांची आघाडी मिळेल हे मी पूर्ण अभ्यासाअंती सांगत आहे. आम्ही व्यवस्थित फिल्डिंग लावली होती. बाणावली, वेळ्ळी, नुवे आणि मिळालीच तर कुंकळ्ळी मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारास आघाडी मिळेल. फातोडांमध्ये आम्ही एक हजार मतांची आघाडी घेतोय. पूर्ण दक्षिण गोव्यात आणखी कुठेच काँग्रेसला आघाडी नसेल.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'सांगे, केपे, कुडचडे, सावर्डे हे मतदारसंघ तसेच फोडा व मुरगाव तालुक्यात भाजपला खूप मोठी लीड मिळणार आहे. महगाव मतदारसंघातही आघाडी मोठी असेल. त्यामुळे पल्लवी धेपे केवळ दहा हजार नव्हे तर पंचवीस हजार मतांनी निवडून येणार आहे. ख्रिस्तीधर्मीय जेवढी मते काँग्रेसने अपेक्षित धरली, तेवढी ती त्यांना मिळणार नाही. अनेक खिस्ती मतदार व नेते आमच्यासोबत होते, भाजपलाच खिस्ती धर्मियांचीही खूप मते यावेळी मिळतील.'

गोविंद गावडे यांच्याशी मी बोलणार

दरम्यान, मंत्री गोविंद गावडे यांच्या विधानांविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, भी लवकरच मंत्री गावडे यांच्याशी सविस्तर बोलणार आहे. मी गोव्यात परतल्यानंतर गावडे यांच्याशी बैठक घेईन. गावडेदेखील गोव्याबाहेर होते व त्यामुळे भेट होऊ शकली नाही. पण त्यांच्याशी मी चर्चा करीन. सध्या गोव्यात मंत्रिमंडळ फेररचनेचा वगैरे आपला विचारच नाही

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतnorth-goa-pcउत्तर गोवाsouth-goa-pcदक्षिण गोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४