नागवात दुचाकी जाळल्या;

By Admin | Updated: December 9, 2014 00:56 IST2014-12-09T00:51:23+5:302014-12-09T00:56:02+5:30

हणजूण : हडफडे-नागवाच्या सरपंच सुषमा नागवेकर यांच्या गॅरेजमधील चार दुचाक्यांना आग लावून अज्ञाताने जाळल्या. त्यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.

Bicycle burns in Naga; | नागवात दुचाकी जाळल्या;

नागवात दुचाकी जाळल्या;

हणजूण : हडफडे-नागवाच्या सरपंच सुषमा नागवेकर यांच्या गॅरेजमधील चार दुचाक्यांना आग लावून अज्ञाताने जाळल्या. त्यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपूर्वी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावर हडफडे येथे झालेल्या हल्ल्याशी या घटनेचा संबंध आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
सोमवार दि. ८ रोजी पहाटे २.३० वाजता सरपंच सुषमा नागवेकर यांचे पती श्रीकृष्ण नागवेकर यांना घराबाहेर आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, त्यांच्या गॅरेजमध्ये पार्क करून ठेवलेल्या चार दुचाकी व एक सायकल आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. जीए ०१ सी १९६४ ही टीव्हीएस वेगो मोटारसायकल, जीए ०१ सी ६१२१ ही वेस्पा स्कूटर, जीए ०१ सी १८७४ ही अ‍ॅक्टिव्हा स्कूटर, जीए ०३ एबी ९१८६ या क्रमांकाची डिओ स्कूटर अशा त्यांच्या तीन व एक मित्राची अशा चार गाड्या जळत होत्या. श्रीकृष्ण नागवेकर यांनी त्वरित म्हापसा अग्निशामक दलास खबर दिल्यानंतर दलाचे जवान येईपर्यंत सर्व गाड्या व सायकल जळून भस्मसात झाले. हणजूण पोलीस स्थानकात याबाबत नोंद करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या गाड्या घराबाहेरील गॅरेजमध्ये ठेवत होतो. गॅरेजला शटर नाही. आम्हाला गावात कोणी शत्रू नाही किंवा कोणाचे आमच्याशी वैरही नाही. आम्हाला रात्री जाग आल्यानंतर गाड्या जळत असल्याचे समजले, असे सरंपच सुषमा नागवेकर
यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Bicycle burns in Naga;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.