जुने गोव्यात नवीन संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे आमदार फळदेसाईच्या हस्ते भूमिपूजन
By समीर नाईक | Updated: March 17, 2024 16:18 IST2024-03-17T16:15:56+5:302024-03-17T16:18:39+5:30
यावेळी बोलताना फळदेसाई यांनी स्थानिक नागरिकांना आमदार म्हणून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि पावसाळ्यापूर्वी केवळ या रस्त्याचेच नव्हे तर मतदारसंघातील इतर अनेक रस्त्यांची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन ती पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जुने गोव्यात नवीन संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे आमदार फळदेसाईच्या हस्ते भूमिपूजन
पणजी : कासा आमोरा फेज ३ ते मुख्य रस्त्यापर्यंत आरसीसी स्लॅब व ड्रेनेजसह रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजेश फळदेसाई यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक, जुने गोवा ग्रामपंचायतीच्या सरपंच मेधा पर्वतकर, स्थानिक पंच अंबर आमोणकर यांच्या उपस्थितीत सदर भूमिपूजन पार पडले.
यावेळी बोलताना फळदेसाई यांनी स्थानिक नागरिकांना आमदार म्हणून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि पावसाळ्यापूर्वी केवळ या रस्त्याचेच नव्हे तर मतदारसंघातील इतर अनेक रस्त्यांची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन ती पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आता आचारसंहिता लागू झाली आहे, मात्र विकास कामे थांबणार नाहीत, केवळ उद्घाटनासाठी आम्ही उपस्थित राहणार नाही, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर्सच्या शवप्रदर्शनापूर्वी करमळी तलावाचे सुशोभीकरण तसेच जुने गोवा चर्च परिसराचे सुशोभीकरण यासह मतदारसंघात अनेक 'सुशोभिकरण' कामे हाती घेण्यात येत आहेत. मतदारसंघाची कामे युद्धपातळीवर पुढे नेण्यासाठी स्थानिक पंच व पंचायत समिती सोबत काम करण्याचे आश्वासन फळदेसाई यांनी दिले.