शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भंडारींच्या चळवळीची व्याप्ती वाढली; काँग्रेस नेत्यांना भेटले शिष्टमंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:01 IST

ओबीसींच्या जातनिहाय गणनेसाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: ओबीसींच्या जातनिहाय गणनेसाठी भंडारी समाजाच्या चळवळीची व्याप्ती आता वाढली आहे. समाजाच्या नेत्यांनी काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचीही भेट घेतली. विधानसभेत खासगी ठराव आणण्याचे आश्वासन युरी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

दुसरीकडे या चळवळीची भाजपनेही गंभीर दखल घेतल्याचे दिसत असून प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कृषिमंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन भंडारी समाज पक्षापासून दूर जाऊ नये यासाठी चर्चा केली. रवी हे या समाजाचे खंदे नेते मानले जातात. दोघांमधील चर्चेत या प्रश्नावर ठोस धोरण ठरवण्याबाबत चर्चा विनिमय झाला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मंत्री महादेव नाईक, माजी आमदार किरण कांदोळकर, माजी आमदार श्याम सातार्डेकर, तारक आरोलकर, रोहन नाईक आदींचा समावेश होता.

या भेटीनंतर 'लोकमत'शी बोलताना कांदोळकर म्हणाले की, आम्ही दोघांनाही निवेदन देऊन आमची मागणी मांडलेली आहे. युरी यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात या विषयावर खासगी ठराव आणण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. २०११ साली चुकीची जनगणना झाली होती. २०२१ साली कोविडमुळे ती होऊ शकली नाही. आता नव्याने होणारी जनगणना जातनिहाय केली जावी. ओबीसींच्या बाबतीत जातनिहाय गणना करावी, अशी आमची मागणी आहे. जनगणनेसाठी बाहेरील एजन्सी आम्हाला नकोय. त्याऐवजी बीएलओची मदत घ्यावी, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते, असेही कांदोळकर म्हणाले.

माजी मंत्री, आमदार यांचीच जास्त धडपड!

भंडारी नेत्यांचे शिष्टमंडळ यापूर्वी आमदार विजय सरदेसाई तसेच मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनाही भेटलेले आहे. या चळवळीत भाजपच्या माजी मंत्री, आमदारांचीच जास्त धडपड दिसून येते. माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक तसेच माजी आमदार किरण कांदोळकर यात सक्रिय आहेत. या चळवळीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेही बारकाईने लक्ष आहे. ही चळवळ २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अस्तित्वातराहील की नाही, हे पहावे लागेल.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस