बेतुल येथे सेटेलाइट पोर्टसाठी १0७ एकर जमीन लागणार
By Admin | Updated: July 18, 2016 21:18 IST2016-07-18T21:18:40+5:302016-07-18T21:18:40+5:30
बेतुल येथे सेटेलाइट पोर्टसाठी अद्याप भूसंपादन केलेले नाही, अशी माहिती केंद्रीय जहाजोद्योग राज्यमंत्री पोंडी राधाकृष्णन् यांनी राज्यसभेत खासदार शांताराम नाईक

बेतुल येथे सेटेलाइट पोर्टसाठी १0७ एकर जमीन लागणार
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.१८ - बेतुल येथे सेटेलाइट पोर्टसाठी अद्याप भूसंपादन केलेले नाही, अशी माहिती केंद्रीय जहाजोद्योग राज्यमंत्री पोंडी राधाकृष्णन् यांनी राज्यसभेत खासदार शांताराम नाईक यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात दिली.
सेटेलाइट पोर्टसाठीचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यासाठी १0७ एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. यात ७३.५ एकर जमीन साधनसुविधा विकास महामंडळाकडे आहे तर ३३.६0 एकर जमीन खाजगी मालकीची असल्याचे या उत्तरात म्हटले आहे. बेतुलमध्ये ज्या ठिकाणी हे बंदर येऊ घातले आहे तेथे एमपीटीच्या मालकीची जागा नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.