भाजप आमदारांना मायनिंगचा लाभ!
By Admin | Updated: December 6, 2015 01:39 IST2015-12-06T01:39:02+5:302015-12-06T01:39:25+5:30
पणजी : राज्यात नव्याने सुरू होत असलेल्या खाण व्यवसायाचा लाभ ट्रकमालक किंवा मशिनरीधारकांनाही झालेला नाही.

भाजप आमदारांना मायनिंगचा लाभ!
पणजी : राज्यात नव्याने सुरू होत असलेल्या खाण व्यवसायाचा लाभ ट्रकमालक किंवा मशिनरीधारकांनाही झालेला नाही. उत्तर व दक्षिण गोव्याच्या खाणग्रस्त भागातील भाजपचेच आमदार खाण व्यवसायाचे लाभार्थी असून क्लॉड आल्वारीस यांच्याऐवजी भाजप आमदारांच्या लुटीची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी तीन अपक्ष आमदारांनी शनिवारी येथे केली.
विजय सरदेसाई, रोहन खंवटे आणि नरेश सावळ या तिन्ही अपक्ष आमदारांनी येथे पत्रकार परिषद घेतली. ज्येष्ठ पर्यावरणवादी डॉ. क्लॉड आल्वारीस यांना सध्या भाजप सरकार लक्ष्य बनवीत आहे. आल्वारीस हे राज्याचे शत्रू आहेत, अशा प्रकारचे चित्र भाजपचे आमदार व सरकार रंगवू पाहात आहे हे आक्षेपार्ह असून खाणग्रस्त भागातील भाजपच्या आमदारांनी कशी मालमत्ता जमवली, याची चौकशी अगोदर व्हायला हवी, असे सरदेसाई व अन्य दोन आमदार म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयात आल्वारीस हे याचिकादार आहेत. खाण व्यवसायाचा लाभ ट्रकमालकांना झालेला नाही म्हणून त्यांच्यात असंतोष असून सुर्ल-पाळी येथील हिंसक आंदोलनास सरकार जबाबदार आहे. ट्रकमालकांना सरकारने मागणीनुसार दर द्यायला हवा. भाजपचे आमदार प्रमोद सावंत हे व्ही. एम. साळगावकर कंपनीला व गणेश गावकर हे वेदांता कंपनीला (पान ७ वर)