बार, दारू दुकानांबाबत तोडगा काढू : पर्रीकर

By Admin | Updated: March 18, 2017 02:52 IST2017-03-18T02:50:49+5:302017-03-18T02:52:15+5:30

पणजी : राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरमधील बार आणि दारू विक्री दुकानांच्या समस्येवर तोडगा

Bar, liquor shops should be resolved: Parrikar | बार, दारू दुकानांबाबत तोडगा काढू : पर्रीकर

बार, दारू दुकानांबाबत तोडगा काढू : पर्रीकर

पणजी : राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरमधील बार आणि दारू विक्री दुकानांच्या समस्येवर तोडगा काढला जाईल. त्यासाठीच कायदेशीर पर्यायांचा अभ्यास आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर शुक्रवारी येथे सांगितले.
सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, रोहन खंवटे, पांडुरंग मडकईकर आदी मंत्र्यांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरमधील बार आणि दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात आणखी नव्या महामार्गांची भर पडलेली नाही. नवे महामार्ग अधिसूचित झालेले नाहीत. (खास प्रतिनिधी)

Web Title: Bar, liquor shops should be resolved: Parrikar