आश्वासने पुरे, पगार वाढ लागू करा! अन्यथा पुन्हा संप करु; बालरथ कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
By पूजा प्रभूगावकर | Updated: October 17, 2023 12:52 IST2023-10-17T12:50:24+5:302023-10-17T12:52:23+5:30
मुख्यमंत्र्यांनी ही वाढ करण्याचे तोंडी आश्वासने सुध्दा दिले. मात्र पगारवाढ अजूनही लागू केली नसल्याचाा आरोप त्यांनी केला.

आश्वासने पुरे, पगार वाढ लागू करा! अन्यथा पुन्हा संप करु; बालरथ कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
पणजी: आश्वासने पुरे, आम्हाला पगार वाढ लागू करा अन्यथा पुन्हा संप करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा बालरथ कर्मचाऱ्यांनी सरकारला आहे. सरकारने बालरथ कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा शब्द दिला होते. त्यानुसार चालकांना १७ हजार तर वाहकांना १० हजार रुपये पगार करणे तसेच पगार थेट कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचेही जुलै महिन्यात आश्वासन दिले होते. मात्र ऑक्टोबर १५ तारीख झाली तरी अजूनही आश्वासन पुर्ती झाली नसल्याची टीका कर्मचाऱ्यांनी केली.
बालरथ कर्मचारी संघटनेच्या नेता स्वाती केरकर म्हणाल्या, की शाळा व्यवस्थापन या हायर ॲण्ड फायर चे धाेरण राबवत आहेत. अकरा वर्ष काम कर्मचाऱ्यांना कुठल्याही कारणाशिवाय अचानक कामावरुन काढले जात आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे तसेच प्रामाणिकपणे वाहतून करणाऱ्या बालरथ चालकांना १२ हजार तर वाहकांना केवळ ६ हजार पगार मिळत आहे. हा पगार पुरेसा नसून तो किमान १७ हजार व १० हजार रुपये करावे. मुख्यमंत्र्यांनी ही वाढ करण्याचे तोंडी आश्वासने सुध्दा दिले. मात्र पगारवाढ अजूनही लागू केली नसल्याचाा आरोप त्यांनी केला.