बाळ्ळी जाळपोळ; सर्व निर्दोष!
By Admin | Updated: October 4, 2015 02:22 IST2015-10-04T02:21:58+5:302015-10-04T02:22:18+5:30
मडगाव : चार वर्षांपूर्वी संपूर्ण गोव्यात गाजलेल्या बाळ्ळीतील ‘उटा’ संघटनेच्या आंदोलनानंतर झालेल्या जाळपोळ प्रकरणातील सर्व संशयितांना दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने ‘क्लिन चीट’ दिली

बाळ्ळी जाळपोळ; सर्व निर्दोष!
मडगाव : चार वर्षांपूर्वी संपूर्ण गोव्यात गाजलेल्या बाळ्ळीतील ‘उटा’ संघटनेच्या आंदोलनानंतर झालेल्या जाळपोळ प्रकरणातील सर्व संशयितांना दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने ‘क्लिन चीट’ दिली. विद्यमान क्रीडामंत्री रमेश तवडकर, खासदार नरेंद्र सावईकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांच्यासारख्या हायप्रोफाईल राजकारण्यांचा समावेश असलेल्या या प्रकरणात २१ संशयितांवरील सर्व आरोप न्यायालयाने निकालात काढले. शनिवारी न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांच्या न्यायालयात संशयितांवर आरोप निश्चित करण्यासंदर्भात निवाडा होता. न्यायालयाने या संशयितांवरील सर्व आरोप नामंजूर केले.
न्यायालयात खासदार नरेंद्र सावईकर, ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप, निमंत्रक गोविंद गावडे व सोयरू वेळीप उपस्थित होते. भादंसंच्या १४३, १४७, १४८, ३४१, ४३५, १८८, ३३२ व ३२४ कलमाखालील आरोपांतून सर्व संशयितांची सुटका करण्यात आली. गेल्या २२ सप्टेंबर रोजी न्यायाधीश डिसिल्वा यांच्या न्यायालयात ‘उटा’ आंदोलन जाळोपाळ प्रकरणातील आरोप निश्चित करण्यापूर्वीचा फेरयाचिकेतील अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला होता. यापूर्वी या प्रकरणातील आरोपींपैकी काही आरोपींवर सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले होते, तर सावईकर यांच्यासह
इतर आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात
आले होते. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने फेरविचारार्थ ही सुनावणी पुन्हा सत्र न्यायालयात वर्ग केली होती.
(पान २ वर)