बाबूश गजाआड

By Admin | Updated: May 7, 2016 02:52 IST2016-05-07T02:47:30+5:302016-05-07T02:52:30+5:30

पणजी : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्याखाली सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना शुक्रवारी तीन दिवसांची

Babush Ghazaad | बाबूश गजाआड

बाबूश गजाआड

पणजी : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्याखाली सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना शुक्रवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आई व मावशीने आपल्याला ५0 लाख रुपयांना विकल्याचा जबाब त्या मुलीने दिल्यामुळे तिच्या आईसही पोलिसांनी गजाआड केले आहे. बाबूशसह तिलाही तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. वैशाली लोटलीकर यांनी दिला.
बाबूशसह संबंधित मुलीच्या आईस दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. न्या. लोटलीकर यांनी तीन दिवसांचीच कोठडी मंजूर केली. संबंधित मुलीच्या सावत्र आईसही शुक्रवारी न्यायालयात हजर केले होते. तिची कसून चौकशी करण्यासाठी दहा दिवसांची गरज असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले; मात्र तिलाही तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
(प्रतिनिधी)

Web Title: Babush Ghazaad