आसगावचा लाचखोर पंच डिसोझा जाळ्यात
By Admin | Updated: March 24, 2015 01:16 IST2015-03-24T01:13:59+5:302015-03-24T01:16:03+5:30
हणजूण : बांधकामासाठी परवाना मागणाऱ्या हाउसिंग कंपनीकडे ८ लाख रुपये लाच मागणारा आसगाव ग्रामपंचायतीचा पंच व्हिक्टर डिसोझा

आसगावचा लाचखोर पंच डिसोझा जाळ्यात
हणजूण : बांधकामासाठी परवाना मागणाऱ्या हाउसिंग कंपनीकडे ८ लाख रुपये लाच मागणारा आसगाव ग्रामपंचायतीचा पंच व्हिक्टर डिसोझा याला भ्रष्टाचारविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. त्याला अटक करून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
डिसोझा याने एका बांधकाम कंपनीला बांधकामासाठी पंचायत दाखला देण्यासाठी कंपनीकडे ८ लाख रुपयांची मागणी केली होती. कंपनीने सर्व कायदे-नियमांचे पालन करूनही आणि सर्व दाखले सादर करूनही संबंधितांना पंचायतीचा परवाना मिळवायचा असेल तर लाच द्यावीच लागणार, असे सांगण्यात आले होते. हा प्रकल्प डिसोझा याच्या प्रभागात होणार असल्यामुळे त्याने ही अडवणूक चालविली होती.
या प्रकरणी कंपनीकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला (एसीबी) याची माहिती दिल्यानंतर ‘एसीबी’ने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले. डिसोझा याला आपल्याभोवती सापळा रचला जात आहे, याची कल्पनाही आली नाही. याच कारवाईचा एक भाग म्हणून ८ लाख रुपयांवरून ६ लाखांवर बोलणी
आणण्यात आली. या काळात ‘एसीबी’ने संशयिताविरुद्ध भक्कम पुरावेही गोळा
केले. (वार्ताहर)