शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात वाघांचा पुरस्कार बनला मोठ्या वादाचा विषय, नामदेव ढसाळांच्याही कवितांचे दाखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 10:44 IST

गोव्यासह महाराष्ट्रातही परिचित असलेले साहित्यिक विष्णू वाघ यांच्या कवितासंग्रहावरून आणि नियोजित पुरस्कारावरून गोव्यात मोठा वैचारिक वाद सुरू आहे.

पणजी - गोव्यासह महाराष्ट्रातही परिचित असलेले साहित्यिक विष्णू वाघ यांच्या कवितासंग्रहावरून आणि नियोजित पुरस्कारावरून गोव्यात मोठा वैचारिक वाद सुरू आहे. विशेष म्हणजे या वादात आता प्रथमच ख्रिस्ती धर्मियांमधील काही वकिल, डॉक्टर व लेखकांनी उडी टाकली आहे. काहींनी तर नामदेव ढसाळांच्याही कवितांचे दाखले देऊन वाघांच्या काही आक्षेपार्ह कवितांचे तोकडे समर्थन चालविले आहे.एखाद्या कवितासंग्रहावरून वैचारिक वाद होणे आणि शेवटी त्या कवितासंग्रहास पुरस्कार देण्याचा सरकारी विचार लांबणीवर पडणे असा अनुभव गोव्याला गेल्या पन्नास वर्षांत आता प्रथमच येत आहे. नाटक, कविता व अन्य साहित्य प्रकार हाताळलेले वाघ आजारी आहेत. त्यांनी यापूर्वी लिहिलेला व प्रकाशित केलेला सुदिरसुक्त नावाचा कवितासंग्रह हा बहुतांश वाचकांच्या आता लक्षात आला. गोवा सरकारच्या कोंकणी अकादमीने या पुरस्काराला पुरस्कार देण्याचा प्रयत्न केल्यानंतर वादाची ठिणगी पडली. आता या ठिणगीचे रुपांतर साहित्य वर्तुळात आणि मराठी व कोंकणीप्रेमींमध्ये वणव्यात झाले आहे.गोव्यात उच्चवर्णियांनी अशिक्षित व  समाजाच्या निम्नस्तरातील घटकांचे कायम शोषण केले अशा प्रकारचा सूर अतिशय स्पष्टपणे वाघ यांच्या सुदिरसुक्त कवितासंग्रहामधून व्यक्त होत आहे. याला गोव्यातील अनेक लेखक, कवी व सुजाण वाचकांनी आक्षेप घेतला. यामुळे समाजातील दोन जातींमध्ये दुही माजू शकते असा विचार उदय भेंब्रे व अन्य काही जाणकारांनी लेखांमधून मांडला आहे. काही कवितांमध्ये थेट शिव्यांचा वापर केल्याने या कवितासंग्रहावर अश्लीलतेचा ठपकाही काही लेखक व कवीनी जाहीरपणे ठेवला आहे. नंदकुमार कामत, क्लिओफात कुतिन्हो, राधाराव ग्राषियस अशा काही लेखकानी व वकिलांनी आणि खुद्द प्रकाशकाने या कवितासंग्रहाचे समर्थन केले आहे. काहीजणांनी सोशल मिडियावरून वाघ यांच्या कवितांचे आणि त्यानी लावलेल्या सुरांचे पूर्ण समर्थन करताना महाराष्ट्रातील दलित कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचेही दाखले दिले आहेत. मात्र ढसाळ यांच्या कवितांशी वाघांच्या साहित्याची तुलना करता येणार नाही असे कोकणी साहित्यातील काही मान्यवरांचे म्हणणे आहे. वाघानी लिहिलेल्या काही कविता कुटुंबांमध्ये एकत्र बसून कुणीच वाचू शकणार नाही असा आक्षेप बहुतेक कोंकणी कवींनी घेतला आहे.सुदिरसुक्त कवितासंग्रहाचे समर्थन करणारे लेखक एन. शिवदास, रोहिदास शिरोडकर, भाऊ नाईक आदी काहीनी नुकताच वाघांच्या त्या आक्षेपार्ह कवितांचे जाहीरपणे वाचन करणारा कार्यक्रम घडवून आणला.वाघ यांच्या कवितासंग्रहावरून वाद झाल्याने आता कोंकणी अकादमी पुरस्कार देण्याचा विषय पुढे नेऊ शकलेली नाही. आता निर्णयासाठी या विषयाची फाईल अकादमीकडून  मुख्यमंत्र्यांकडे पाठविली जाणार असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले.