पुरस्कार परत न करता लेखक करणार निषेध
By Admin | Updated: October 16, 2015 02:55 IST2015-10-16T02:54:58+5:302015-10-16T02:55:10+5:30
पणजी : देशातील जातीय व धार्मिक सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न काही घटक करत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक एकत्र आले आहेत

पुरस्कार परत न करता लेखक करणार निषेध
पणजी : देशातील जातीय व धार्मिक सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न काही घटक करत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक एकत्र आले आहेत. आम्ही तूर्त पुरस्कार परत करणार नाही; पण देशातील विविध हिंसात्मक घटनांच्या निषेधार्थ आमचे आंदोलन सुरू राहील. येत्या इफ्फीवेळीही आमचा निषेधात्मक कार्यक्रम सुरू राहील, असे दत्ता दामोदर नायक, एन. शिवदास व अन्य लेखकांनी गुरुवारी जाहीर केले.
पद्मश्री पुरस्कारप्राप्त मारिया आवरोरा कुतो, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त दत्ता नायक, एन. शिवदास, दामोदर मावजो, नागेश करमली, दिलीप बोरकर, पुंडलिक नायक, हेमा नायक, मीना काकोडकर, प्रदीप पाडगावकर, अरुण साखरदांडे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. महाबळेश्वर सैल, तुकाराम शेट व गोकुळदास प्रभू हे अन्य साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त (पान ६ वर)