सहा लाख टन खनिजाचा आज लिलाव
By Admin | Updated: May 12, 2014 01:25 IST2014-05-12T01:25:34+5:302014-05-12T01:25:51+5:30
सहा लाख टन खनिजाचा आज लिलाव

सहा लाख टन खनिजाचा आज लिलाव
पणजी : राज्यातील सुमारे सहा लाख टन खनिज मालाचा ई-लिलाव सोमवारी केला जाणार आहे. हा तिसर्या टप्प्यातील लिलाव असून लिलावासाठी निविदाधारकांसाठी मूळ किंमत खाण खात्याने निश्चित केली आहे. किमान १६० व कमाल २१६० अशी मूळ किंमत खात्याने निर्धारित केली आहे. याबाबतचा तपशील खात्याने संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे. आमोणा, एमपीटी, सारसामन, कापसे, मायणा, कोठंबी, खाजन, वागूस अशा जेटींवर सुमारे सहा लाख टन खनिज माल ई- लिलावासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. बहुतांश माल एमपीटीच्या ठिकाणी आहे. बांदेकर, सेझा, साळगावकर, चौगुले, सुनंदा डी. बांदोडकर, सोसिदादी फोमेन्तो, यांच्या लिज क्षेत्रातून हा खनिज माल काढला गेला आहे. खाण खात्याने यापूर्वी दोनवेळा ई-लिलाव पुकारून तो यशस्वी केला आहे. बर्याच कोटींचा महसूल ई-लिलावाद्वारे उपलब्ध होत आहे. (खास प्रतिनिधी)