नराधम पित्याचा पोटच्या मुलींवर अत्याचार

By Admin | Updated: July 3, 2015 01:30 IST2015-07-03T01:30:15+5:302015-07-03T01:30:24+5:30

वास्को : रक्ताचे नाते विसरलेल्या एका विकृत नेपाळी पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार वास्कोत उघडकीस आला आहे.

Atrocities against Narada's father's daughter | नराधम पित्याचा पोटच्या मुलींवर अत्याचार

नराधम पित्याचा पोटच्या मुलींवर अत्याचार

वास्को : रक्ताचे नाते विसरलेल्या एका विकृत नेपाळी पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार वास्कोत उघडकीस आला आहे. या संदर्भात मुलींच्या आईने आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली आहे़
वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील सरकारी कुटीर रुग्णालयाजवळ राहणाऱ्या जनक बिशु कर्मा या ३८ वर्षीय नेपाळी इसमाने काही दिवसांपूर्वी जबरदस्तीने आपल्या ७ आणि ११ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केल्याची तक्रार त्याची पत्नी श्यामू जनक कर्मा (२८ वर्षे) हिने नोंदविली आहे़ या नराधम पित्याने आपल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केला, तसेच या घटनेची वाच्यता केल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली़ या तक्रारीनुसार वास्को पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे़ त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३५४, ३५४ (अ), ३५४ (ब), ३७६, ३७७, ३२४, ३२३, ५०६ (्र्र) गोवा बाल कायद्याच्या कलम ८ (्र्र) आणि ‘पोस्को’ कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ खाली गुन्हा नोंदविला आहे़ वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक जॉन फ र्नांडिस पुढील चौकशी करत आहेत.
हे कुटुंब चिखली कुटीर रुग्णालयाजवळ मजूर म्हणून कामाला असून ते मूळचे नेपाळ येथील आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Atrocities against Narada's father's daughter