शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मांडवी व जुवारी नदीत वाजपेयींच्या अस्थींचे शुक्रवारी विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 12:40 IST

गोव्यातील मांडवी व जुवारी नदीत शुक्रवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.

पणजी : गोव्यातील मांडवी व जुवारी नदीत शुक्रवारी (24 ऑगस्ट) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस उत्तर व दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघांमध्ये वाजपेयींच्या अस्थींचे दर्शन लोकांना व्हावे म्हणून भाजपतर्फे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी मंगळवारी  पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बुधवारी तेंडुलकर व भाजपचे खजिनदार संजीव देसाई हे दिल्लीला जात आहेत. त्यांच्याकडून दोन अस्थिकलश गोव्यात आणले जातील. सायंकाळी पाच वाजता दाबोळी विमानतळावर अस्थिकलश पोहचतील. सायंकाळी सहा वाजता सांकवाळ येथे शांतादुर्गा मंदिराच्या बाजूला अस्थिकलश दर्शनासाठी काही मिनिटे ठेवले जातील. मग पिलार जंक्शनहून मळा पणजी येथे सातच्या सुमारास अस्थिकलश आणले जातील. साडेसात वाजता पणजीतील भाजप कार्यालयात हे अस्थिकलश ठेवले जातील, असे तानावडे यांनी सांगितले.

23 रोजी सकाळी नऊ वाजता पर्वरी पीडीए कॉलनी येथे अस्थिकलश ठेवले जातील. मग कळंगुट, शिवोली, मांद्रे, पेडणो, म्हापसा अशा ठिकाणी अस्थिकलश लोकांच्या दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. सार्वजनिक दर्शनाच्या कार्यक्रमात कुणीही सहभागी होऊ शकतात. याच दिवशी दक्षिण गोव्यातही अस्थिकलश दर्शनाचे कार्यक्रम सर्वत्र होतील. 24 रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत पणजीतील कॅप्टन ऑफ पोर्ट जेटीकडे मांडवी नदीत अस्थिविसजर्नाचा कार्यक्रम होईल, असे तानावडे यांनी जाहीर केले. याचप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता कुठ्ठाळी फेरी धक्क्याकडून फेरीबोटीतून अस्थिकलश जुवारी नदीत नेला जाईल व अस्थींचे तिथे विसर्जन केले जाईल. 

गोव्यात काँग्रेस पक्षानेही यावेळी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहणारा कार्यक्रम आयोजित केला होता याविषयी पत्रकारांनी विचारले असता, वाजपेयी हे सर्वमान्य असे नेते होते व त्यामुळे काँग्रेसने प्रेमापोटी श्रद्धांजली वाहिली असावी, असे तेंडुलकर म्हणाले. कम्युनिस्टांसह सर्वच पक्षांतील लोकांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली आहे असे तेंडुलकर यांनी नमूद केले. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीgoaगोवा