लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: ग्रामीण विकास खात्याच्या गोवा ग्राम समृद्धी योजने अंतर्गत सादर करण्यात आलेल्या १३१ प्रकल्पांच्या प्रस्तावांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रत्येक मतदारसंघात किमान एक प्रकल्प होणार असून निधीत वाढ केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनीसांगितले.
राज्याच्या सर्व भागांपर्यंत विकासाची फळे पोहोचावीत, या उद्देशाने ही व्यापक बैठक घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक मतदारसंघातील आमदारांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून विकासात प्रादेशिक समतोल राखण्यावर भर दिला जाणार आहे.
सध्या योजनेसाठी असलेल्या २० कोटी रुपये निधीव्यतिरिक्त येत्या आर्थिक वर्षात अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला. वाढीव निधीतून पायाभूत सुविधा विकास, सामुदायिक प्रकल्प, ग्रामीण भागातील मूलभूत सेवा सुधारणा यासारखी कामे गतीने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गावांना मजबूत पायाभूत सुविधा, चांगली जोडणी आणि सामुदायिक विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. संतुलित प्रादेशिक विकास हे सरकारचे ध्येय असून तळागाळातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणे ही आमची बांधिलकी आहे.'
गोवा ग्राम समृद्धी योजनेमुळे ग्रामीण रस्ते, सार्वजनिक सुविधा, समुदाय भवन, पाणीपुरवठा यांसारखी कामे गावांच्या गरजेनुसार स्थानिक विकास सर्व मतदारसंघांमध्ये समान संधी यांना चालना मिळणार आहे.
Web Summary : Chief Minister Pramod Sawant reviewed 131 rural development project proposals. Each constituency will have at least one project with increased funding. The goal is balanced regional development, prioritizing infrastructure and essential services. The government aims to provide better facilities and opportunities for community development in every village.
Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने 131 ग्रामीण विकास परियोजना प्रस्तावों की समीक्षा की। प्रत्येक निर्वाचन क्षेत्र में बढ़े हुए धन के साथ कम से कम एक परियोजना होगी। संतुलित क्षेत्रीय विकास, बुनियादी ढांचे और आवश्यक सेवाओं को प्राथमिकता देना लक्ष्य है। सरकार का लक्ष्य प्रत्येक गांव में बेहतर सुविधाएं और सामुदायिक विकास के अवसर प्रदान करना है।