विधानसभा अधिवेशन उद्यापासून

By Admin | Updated: March 13, 2016 01:59 IST2016-03-13T01:57:25+5:302016-03-13T01:59:18+5:30

पणजी : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. पाच दिवसांच्या या अधिवेशनावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

From the assembly session tomorrow | विधानसभा अधिवेशन उद्यापासून

विधानसभा अधिवेशन उद्यापासून

पणजी : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. पाच दिवसांच्या या अधिवेशनावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर १६ रोजी दुपारी अडीच वाजल्यानंतर २०१६-१७ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पावर अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून मिळाली.
दहा-बारा महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सरकार करवाढ जास्त प्रमाणात करणार नाही, अशी माहिती मिळते. तंबाखू तसेच दारूवरील करांत वाढ केली जाईल. गृह आधार योजनेखाली महिलांना मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ केली जाईल. तसेच ज्या घटकांना शासकीय योजनांचा लाभ आतापर्यंत मिळत नाही, त्या घटकांना योजनेच्या लाभाच्या कक्षेत आणले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. या अधिवेशनात चार महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून घेतले जाणार आहे.
अधिवेशनासाठी विरोधक व सत्ताधाऱ्यांनी मिळून सुमारे साडेसातशे प्रश्न सादर केले आहेत. काही खासगी ठराव तसेच सरकारी विधेयकेही अधिवेशनात सादर करणार आहेत. शुक्रवार, १८ रोजी अधिवेशनाचा समारोप होईल.
दरम्यान, अधिवेशन काळात पर्वरी व पणजी
पोलीस स्थानकाच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मोर्चे काढणे, मिरवणुका काढणे, आंदोलन करणे यावर बंदी लागू करणारा आदेश उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी जारी केला आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: From the assembly session tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.