केजरीवालांचा गोमंतकीयांना सुखद धक्का, दिल्लीत कोंकणी अकादमीची स्थापन करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 01:24 PM2021-01-08T13:24:47+5:302021-01-08T13:26:39+5:30

Konkani Academy : दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेऊन केजरीवाल यांनी गोमंतकीयांना आश्चर्याचा पण सुखद धक्का दिला, असे राजकीय गोटात मानले जात आहे.

Arvind Kejriwal pleasant shock to Gomantakis, decision to set up Konkani Academy in Delhi | केजरीवालांचा गोमंतकीयांना सुखद धक्का, दिल्लीत कोंकणी अकादमीची स्थापन करण्याचा निर्णय

केजरीवालांचा गोमंतकीयांना सुखद धक्का, दिल्लीत कोंकणी अकादमीची स्थापन करण्याचा निर्णय

Next
ठळक मुद्देगोवा जिंकण्याची इच्छा ठेवलेल्या आम आदमी पक्षाने विविध प्रकारे आपले काम राज्यात सुरूच ठेवले आहे.

पणजी : दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन केली जाईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे. अकादमी स्थापन करण्याचा निर्णय हा शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणून घेतला गेला, असेही केजरीवाल यांनी जाहीर करून गोमंतकीयांना सुखद धक्का दिला आहे.

गोवा जिंकण्याची इच्छा ठेवलेल्या आम आदमी पक्षाने विविध प्रकारे आपले काम राज्यात सुरूच ठेवले आहे. आम आदमी पक्षाने गोव्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत एक जागा जिंकली. बाणावलीत जिंकलेल्या उमेदवाराला फोन करून केजरीवाल यांनी स्वत: त्या विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले होते.

दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेऊन केजरीवाल यांनी गोमंतकीयांना आश्चर्याचा पण सुखद धक्का दिला, असे राजकीय गोटात मानले जात आहे. कोंकणी ही गोव्याची राज्यभाषा आहे व राज्यभर सगळीकडेच कोंकणी बोलली जाते. घटनेच्या आठव्या परिशिष्टातही कोंकणीला स्थान आहे. मराठी ही राजभाषा कायद्यात सहभाषा आहे. 

कोंकणीला प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण आहे व त्यामुळे दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन करू, असे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. कोंकणी बोलणाऱ्या सर्वांचे आपण अभिनंदन करतो व जे कोंकणीवर प्रेम करतात त्या सर्वांचे देखील अभिनंदन करतो, असे केजरीवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांची ही नवी चाल गोव्यात आम आदमी पक्षाला मदतरुप ठरेल काय याविषयी भाजपामध्ये व विरोधी काँग्रेस पक्षातही चर्चा सुरू झाली आहे. गोव्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर असतानाच १९८७ साली कोंकणी भाषा राज्यभाषा झाली. कोंकणीसाठी त्यावेळी मोठे आंदोलन झाले होते. मात्र, केंद्रात व गोव्यात अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने कधी दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन केली नाही. गोव्यात कोंकणी अकादमी आहे. भाजपनेही अनेक वर्षे सत्तेत राहून देखील कधी गोव्याबाहेर कोंकणी अकादमी स्थापन करण्याचा विचार केला नव्हता.
 

Web Title: Arvind Kejriwal pleasant shock to Gomantakis, decision to set up Konkani Academy in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.