मुलांच्या किलबिलाटात रंगला आर्ट मेळा

By Admin | Updated: May 20, 2014 01:38 IST2014-05-20T01:37:33+5:302014-05-20T01:38:13+5:30

पणजी : डिचोली सम्राट क्लब आणि लोकमत बाल विकास मंचतर्फे रविवार, दि. १८ रोजी डिचोली येथे आयोजित आर्ट मेळ्याला बालचमंूचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़

Art Mela in Children's Club | मुलांच्या किलबिलाटात रंगला आर्ट मेळा

मुलांच्या किलबिलाटात रंगला आर्ट मेळा

पणजी : डिचोली सम्राट क्लब आणि लोकमत बाल विकास मंचतर्फे रविवार, दि. १८ रोजी डिचोली येथे आयोजित आर्ट मेळ्याला बालचमंूचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ पहिली ते दहावीच्या मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळ्याला पालकही उपस्थित होते़ या वेळी कीर्तिकुमार प्रभू यांनी मुलांना पेंटिंगविषयी माहिती देऊन वस्तुचित्र रंगवायला सांगितले. त्यानुसार मुलांनी आपापल्या कल्पनाशक्तीने पेन्सिलद्वारे रेखाटन न करता केवळ रंगांच्या साहाय्याने वेगवेगळी चित्रे रंगवली. तसेच झावळांपासून फुले, गिरगिरे किर पक्षी आदी करायला शिकवले. याव्यतिरिक्त पुष्पगुच्छ बनविण्याच्या स्पर्धेत शिवम हरमलकर आणि माधवी रायकर यांनी बक्षीस पटकावले. तसेच एक मिनिटाच्या खेळात सोमेश कुमार, सानिया चणेकर, यतिन राऊळ, मिताली नावेलकर, अमोघ सावंत आणि शिवराम प्रभू यांनी बक्षीस पटकावले. या मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रशांत चणेकर, डिचोली सम्राट क्लबचे अध्यक्ष दत्ताराम शेट्ये, सचिव निशांत चणेकर, प्रकल्प संयोजक चंद्रशेखर तेली, जयदेव प्रभुगावकर, कीर्तिकुमार प्रभू उपस्थि होते. आपल्या भाषणात प्रशांत चणेकर यांनी आर्ट मेळा आयोजित करून मुलांना मुक्त वातावरणात विविध कला शिकण्याची संधी दिल्याबद्दल ‘लोकमत’ आणि डिचोली सम्राट क्लबचे कौतुक करून यापुढेही असेच उपक्रम राबवण्याचे आवाहन केले़ या वेळी दत्ताराम शेट्ये यांनी स्वागत केले. समारोपप्रसंगी दत्ताराम शेट्ये, निशांत चणेकर, जयदेव प्रभुगावकर, प्रा. प्रवीण सावंत, सत्यवान हरमलकर कीर्तिकुमार प्रभू यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. हा आर्ट मेळा यशस्वी करण्यासाठी प्रसाद नाईक, साईनाथ शिरोडकर, अजय प्रभुगावकर, शेखर कोरगावकर, नीलेश पेडणेकर, दीपक मराठे, संजीव वेर्णेकर यांनीही सहकार्य केले. शेवटी प्रा. प्रवीण सावंत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Art Mela in Children's Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.