नियमभंग करणार्‍या वाहनधारकांची धरपकड

By Admin | Updated: May 15, 2014 09:40 IST2014-05-15T01:01:48+5:302014-05-15T09:40:34+5:30

पणजी : राज्यात वाहतुकीच्या नियमांचा भंग होऊ नये म्हणून वाहनधारकांविरुद्ध वाहतूक खात्याने सुरू केलेल्या मोहिमेत वाहतूक अधिकार्‍यांनी गेल्या चार दिवसात एकूण ६९१ वाहनांची तपासणी केली.

The arrest of the violators of the rules | नियमभंग करणार्‍या वाहनधारकांची धरपकड

नियमभंग करणार्‍या वाहनधारकांची धरपकड

पणजी : राज्यात वाहतुकीच्या नियमांचा भंग होऊ नये म्हणून वाहनधारकांविरुद्ध वाहतूक खात्याने सुरू केलेल्या मोहिमेत वाहतूक अधिकार्‍यांनी गेल्या चार दिवसात एकूण ६९१ वाहनांची तपासणी केली. दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापल्यामुळे एकूण ४६ दुचाकी वाहनधारकांना दंड दिला. फॅन्सी क्रमांकपट्टी वापरल्याने १५0 वाहनचालकांना दंड तर फिल्मिंग केलेल्या काचा असलेल्या २६२ चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. फॅन्सी क्रमांकपट्टी लावणे व काचांना फिल्मिंग करणे या गुन्ह्यांसाठी दोन हजार रुपये दंड देण्यात आला. हेल्मेट न घालता दुचाकी चालविणार्‍यांना आठशे रुपये दंड आकारण्यात आला. तर वाहतुकीसंबंधी इतर नियम मोडणार्‍या २३३ वाहनधारकांंवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली, असे वाहतूक खात्याने दिलेल्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. काचांना फिल्मिंग केलेल्या वाहनांचे वाहनधारक दंड भरूनही पुन्हा गाड्यांना फिल्मिंग करतात. वाहतूक अधिकार्‍यांना अशा गाड्या आढळल्यास हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे पाठविण्यात येईल. वाहनांच्या काचांवर फिल्मिंग केल्यास दंड आकारण्यात यावा, हा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे, असे देसाई म्हणाले. धुम स्टाईलने दुचाकी हाकणार्‍याविरोधांतही कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. रात्री उशिरा धुम स्टाईलने दुचाक्या हाकल्या जातात. त्याचप्रमाणे वाहतूक अधिकार्‍यांना अचानक त्यांना अडवणे शक्य होत नाही व ते धोकादायकही असते. त्यामुळे अशा पद्धतीने गाडी चालविणार्‍यांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून सामान्य जनतेने वाहतूक खात्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी केले आहे. राज्यातील वाहतूक नियम येथे येणार्‍या पर्यटकांनाही पाळावे लागणार आहेत. वाहतूक अधिकार्‍यांनी १0 मे पासून सुरू केलेल्या कारवाईत पर्यटकांच्या गाड्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देसाई यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The arrest of the violators of the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.