धार्मिक भावना दुखावणाऱ्यांना अटक करा; मुस्लिम बांधवांची पोलिसांना मागणी
By काशिराम म्हांबरे | Updated: September 30, 2023 14:58 IST2023-09-30T14:57:35+5:302023-09-30T14:58:26+5:30
सदर पोस्टमुळे आमच्या भावना दुखावल्या असल्याची माहिती या संघटनेच्या नेत्यांकडून देण्यात आली.

धार्मिक भावना दुखावणाऱ्यांना अटक करा; मुस्लिम बांधवांची पोलिसांना मागणी
म्हापसा - सोशल मिडीयाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावून राज्यातील धार्मिक एकोपा बिघडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन संशयिताला अटक करण्याची मुस्लिम बांधवांनी मागणी केली आहे. म्हापसा पोलीस स्थानकावर ८ विविध संघटनांनी एकत्रीत येऊन या संबंधी लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
धार्मिक भावना दुखावणारा एक पोस्ट इन्स्टाग्रामवर अज्ञात इसमा कडून ईदच्या पार्श्वभूमीवर पोस्ट करण्यात आला होता. या पोस्टात अत्यंत चुकिच्या शब्दांचा वापर करण्यात आलेला. घडलेल्या या प्रकाराचा निशेद नोंदवण्यासाठी तसेच त्याला अटक व्हावी ही मागणी घेऊन शेकडो मुस्लिम बांधवा म्हापसातील पोलीस स्थानकावर एकत्रीत झाले होते. त्यांनी निरीक्षक सिताकांत नाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
सदर पोस्टमुळे आमच्या भावना दुखावल्या असल्याची माहिती या संघटनेच्या नेत्यांकडून देण्यात आली. अॅड. महम्मद इब्राहिम यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार निशेद करण्या सारखा असल्याचे सांगितले. म्हापसा जामा मस्जिदचे माजी अध्यक्ष फिरोज खान यांनी सुद्धा निशेद व्यक्त केला. धार्मिक भावना दुखावणाºया विरोधात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार कडक कारवाई करावी अशी मागणी खान यांनी केली. आम्हाला सरकारवर तसेच पोलीस यंत्रणेवर विश्वास असून हा प्रकार करणाºया विरोधात कारवाई करुन त्याला अटक केली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. निरीक्षकांनी दोन दिवसात योग्य अशी कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले.