शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

श्री देवी लईराई संदर्भात आक्षेपार्ह विधान, श्रेया धारगळकरांना अटक करा- भक्तांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 14:26 IST

धारगळकरांना अटक न केल्यास सर्व भक्तांना एकत्रीत करून कायदा हातात घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

काशिराम म्हांबरे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरगांव येथील देवी लईराईचे भाविक तसेच धोंडा विरोधात सोशल मिडीयावर  आक्षेपार्य विधान करुन त्यांच्या भावना दुखवल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या श्रेया धारगळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावे. तसेच त्यांना राज्यातून हद्दपार करण्यात यावे अशी मागणी देवीच्या भक्तांनी म्हापशातील पोलीस स्थानकावर धडक देऊन केली.

धारगळकरांना अटक न केल्यास सर्व भक्तांना एकत्रीत करून कायदा हातात घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे पोलीस स्थानकाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी कुंकळ्ळी तसेच डिचोलीतूनही धारगळकरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरणीत संस्थान व महाजनांबाबत आक्षेपार्य व्हिडीओ व्हायरल करून बदनामी  केल्या प्रकरणी दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी पोलिसांनी धारगळकरांना यापूर्वी अटक केली होती. 

म्हापसा तसेच परिसरातील अनेक भक्तांनी येथील पोलीस स्थानकावर धडक देऊन श्रेया धारगळकर तसेच इतर अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली. नंतर उपस्थित भक्तगणातील शिष्टमंडळाने उपअधिक्षक संदेश चोडणकर तसेच निरीक्षक निखील पालयेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. 

यावेळी महिला भक्तगण मोठ्या संखेने उपस्थित होत्या. उपस्थितांनी देवीचा जयजयकार केला तसेच धारगळकरा निशेद करून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. देवीच्या भक्तांच्या भावना दुखवणाऱ्या अशा समाज कंटकावर कारवाई करून त्यांना राज्यातून हद्दपार करावे असेही भक्तगण मागणी करीत होते. केलेल्या मागणीवर आजच निर्णय घेऊन कारवाई करावी असेही भक्तगण म्हणत होते. अटक करण्यात आलेल्या धारगळकरांना सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारवाई टाळण्यासाठी त्या ढोंग करीत असल्याचाही आरोप यावेळी करून धारगळकरांवर कारवाई करावी अशी मागणी रुपाली नाईक यांनी केली. 

उपेंद्र गांवकर प्रविण आसोलकर यांनी यांनी धारगळकरांना अटक करावी अशी मागणी केली. तसेच देवळात जाऊन सर्वांची जाहीर माफी मागावी असेही भक्तगण म्हणाले. निरीक्षक निखील पालयेकर यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन भक्तांना यावेळी दिले. 

दरम्यान काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर देवी लईराईच्या जत्रेसंबंधी चुकिचा पोस्ट टाकणाऱ्या त्या मुलीवरही कारवाई व्हावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. ती मुलगी अल्पवयिन असल्याने त्या मुलीचा आईने माफी मागीतली होती पण की मुलगी अल्पवयिन नसल्याचा दावा भक्तगण गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी करीत होते.

टॅग्स :templeमंदिर