शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पणजीतील लष्कराची जागा सार्वजनिक वापरासाठी द्यावी; मुख्यमंत्र्यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:28 IST

मुख्यमंत्री काल सकाळीच विविध मागण्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन शहरातील लष्करी आस्थापने व इस्पितळाची जागा रिकामी करुन सार्वजनिक वापर करू द्यावा, अशी मागणी केली. तसेच होंडा-सत्तरीतील हेलिकॉप्टर इंजिन दुरुस्ती युनिट लवकरात लवकर सुरु करावे व राज्यात सैनिक शाळा उघडावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री काल सकाळीच विविध मागण्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते. केंद्रीय वाणिज्य तथा उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनाही ते भेटले. लष्कराचे टू सिग्नल सेंटरही भर शहरात मोठी जागा व्यापून आहे. तसेच गॅरिसन इंजिनियरिंग कार्यालयानेही मोठी जागा व्यापली आहे. राजधानी शहरात आधीच जागेची टंचाई आहे, त्यामुळे लष्कराने ही जागा रिकामी करुन द्यावी, यासाठी गेली अनेक वर्षे राज्य सरकार पाठपुरावा करत आहे. शिवाय कांपाल येथील लष्करी व दंत रुग्णालयांची जागा रिकामी करुन या जागेचा सार्वजनिक वापर करु द्यावा, अशी दीर्घकालीन मागणी आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी हे विषयही राजनाथ सिंह यांच्याकडे मांडले. बांबोळीला वगैरे लष्करी आस्थापने आहेत. नौदल तळही गोव्यात आहेत. परंतु एकही सैनिक शाळा नाही. त्यामुळे एक सैनिक शाळा उघडावी, अशी मागणीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.

होंडा हेलिकॉप्टर प्रकल्प मार्गी लावा

हेलिकॉप्टर इंजिन एमआरओ प्रा. लि,चा प्रकल्प होंडा येथे सुरू होणार होता. मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री असताना त्यांनी हा प्रकल्प मंजूर करुन घेतला होता. हा हेलिकॉप्टर प्रकल्प हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि सफ्रान हेलिकॉप्टर इंजिन्स यांच्या संयुक्त उपक्रमातून सुरू होणार होता. हेलिकॉप्टर देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल सुविधा येथे येणार होती. हा प्रकल्प हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने डिझाइन व उत्पादित हेलिकॉप्टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या टीएम ३३३ आणि शक्ती गॅस टर्बाइन इंजिन्सच्या दुरुस्तीवर केंद्रित आहे. दरवर्षी ५० इंजिन दुरुस्त करण्याच्या व कालांतराने १५० इंजिन्स दुरुस्तीचे उद्दिष्ट ठेवून करण्यात येणार होता. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १७० कोटी होता. २०२३ च्या अखेरीस ही सुविधा कार्यान्वित होण्याची अपेक्षा होती. मात्र, तो रखडला असून केंद्रीयमंत्र्यांनी प्रकल्प मार्गी लावावा, असेही सावंत म्हणाले. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतRajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग