अर्जुन साळगावकरांच्या छातीत कळा..!

By Admin | Updated: June 15, 2017 02:18 IST2017-06-15T02:15:39+5:302017-06-15T02:18:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : बेकायदेशीर खाण प्रकरणात एसआयटीकडून साळगावकर खाण कंपनीचे संचालक अर्जुन साळगावकर यांना त्यांच्या कार्यालयातून

Arjun Salgaonkar's chest in the chest ..! | अर्जुन साळगावकरांच्या छातीत कळा..!

अर्जुन साळगावकरांच्या छातीत कळा..!

लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : बेकायदेशीर खाण प्रकरणात एसआयटीकडून साळगावकर खाण कंपनीचे संचालक अर्जुन साळगावकर यांना त्यांच्या कार्यालयातून एसआयटीच्या कार्यालयात आणून चौकशी केली; परंतु चौकशी सुरू असतानाच त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे एसआयटीलाच त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले.
बुधवारी अचानक एसआयटीचे पथक साळगावकर यांच्या आल्तिनो येथील कार्यालयात दाखल झाले. या अनपेक्षित धक्क्यामुळे साळगावकर गोंधळले; परंतु एसआयटी पथकाबरोबर ते निमूटपणे एसआयटीच्या कार्यालयात गेले. एसआयटीकडून त्यांची बराच वेळ चौकशी करण्यात आली. त्यांच्या खाण कंपनीकडून करण्यात आलेल्या उल्लंघनाचे कागदोपत्री पुरावे एसआयटीकडून दाखविण्यात आले. एसआयटीकडून बऱ्याच तयारीनिशी आपल्याला बोलावण्यात आल्याचे साळगावकर यांच्या लक्षात आले. तसेच एसआयटीचे इरादेही स्पष्टपणे कळत होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या अटकेचीही तयारी एसआयटीकडून करण्यात आली होती; परंतु साळगावकर यांच्या छातीत दुखणे सुरू झाल्यामुळे एसआयटीला बेत बदलावा लागला. एवढेच नव्हे तर १०८ आणीबाणी सेवेला बोलावून गोवा वैद्यकीय इस्पितळात पाचारण करण्याची वेळ एसआयटीवरच आली.
केवळ अटक चुकविण्यासाठी साळगावकर यांच्याकडून छातीतील दुखण्याचे निमित्त सांगण्यात आले असल्याचे लोकांकडून तर्क करणे अपेक्षित असले तरी साळगावकर यांचे दुखणे हे नाटकी नव्हते. त्यांना खरोखरच त्रास सुरू झाला होता, अशी माहिती इस्पितळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. व्हिलचेअरवरून त्यांना रुग्णवाहिकेत बसवण्यात आले. काही अटींवर नंतर त्यांना खासगी इस्पितळात उपचार घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
खाण प्रकरणाचा तपास अधिकारी बदलल्यानंतर बड्या खाण कंपन्यांना समन्स जाऊ लागले आहेत. पैकी तिघा खाण कंपन्यांच्या संचालकांची एक वेळा चौकशी करण्यात आली आहे. तर नथुरमल कंपनीचे हरिश मेलवानी यांनी समन्सला प्रतिसाद न देता अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दत्तगुरू सावंत या प्रकरणाचे नवीन तपास अधिकारी आहेत.

Web Title: Arjun Salgaonkar's chest in the chest ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.