शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा सक्तीची, हिंसाचार खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 17:12 IST

मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली.

पणजी : राज्यात पर्यटन व्यवसाय वाढायला हवा आणि त्यासाठी अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा गरजेची आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे सांगून पूर्ण मंत्रिमंडळ गोवामाईल्स सेवेसोबत असल्याचेच स्पष्ट संकेत दिले. जे अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवेला विरोध करतात, त्यांचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असाही इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. बैठकीत अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा व दक्षिण गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांनी चालविलेले आंदोलन याविषयी चर्चा झाली. सर्व मंत्र्यांनी ठामपणे अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवेची पाठराखण केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांनी अगोदर एक महिना तरी, अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवेशी स्वत:ला जोडून घ्यावे. स्वत:ची नोंदणी करावी, असे सावंत यांनी सांगितले.

प्रायोगिक तत्त्वावर एक महिना त्यांनी अनुभव घ्यावा. गरज पडल्यास येत्या अधिवेशनात आम्ही संबंधित कायद्यातही दुरुस्ती करू. गोवा माईल्सच्या सेवेखाली जे टॅक्सीवाले आले आहेत, त्यांचे उत्पन्न पूर्वीच्या तुलनेत आता वाढले आहे. त्यामुळे उर्वरित टॅक्सी व्यवसायिकांनी एक महिना तरी, अनुभव घ्यावा व जर अ‍ॅप आधारित व्यवस्था परवडत नसेल तर मग आंदोलन करावे, असे सावंत म्हणाले. अ‍ॅपआधारित टॅक्सींना आम्ही पोलिस संरक्षण देऊ. कुणाचाच हिंसाचार सहन केला जाणार नाही. लोकांना अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा हवी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

सर्वांना जैव-शौचालये मंत्रिमंडळाने मंगळवारी जैव-शौचालयांसाठी असलेल्या दरांमध्येही कपात केली. पूर्वी दहा व पाच हजार रुपये असा दर होता. तो साडेचार हजार ते अडिच हजार रुपये असा केला गेला आहे. ओबीसी व अन्य घटकांसाठी दरात आणखीही बदल झाला आहे. ज्या लोकांकडे शौचालये नाहीत, त्यांनी जैव-शौचालये लगेच बसवून घ्यावीत असे सरकारला अपेक्षित आहे. ग्रामपंचायती व पालिकांच्या स्तरावर त्यासाठी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. येत्या दि. 30 जूनरपर्यंत अर्ज असतील. लोकांनी अर्ज भरल्यास त्वरित जैव-शौचालय पुरविले जाईल. 31 ऑगस्टपर्यंत आम्हाला पूर्ण गोवा हागणदारीमुक्त करायचा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बांधकामाच्या ठिकाणी जे मजुर काम करतात, त्यांना कंत्रटदारांमार्फत किंवा मजूर खात्यामार्फत शौचालये पुरविली जातील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दक्षिण व उत्तर गोव्यात कुमेरी शेतक-यांशीनिगडीत अनेक दावे प्रलंबित आहेत. हे दावे लवकर निकालात काढण्यासाठी काही अधिकारी व कर्मचा-यांना सेवावाढ देणो व काहीजणांची कंत्रट पद्धतीवर नियुक्ती करणो असे निर्णयही मंत्रिमंडळाने घेतले.मलनिस्सारण वाहिन्या काही ठिकाणी टाकण्यात अडथळे येतात. त्यासाठी येत्या अधिवेशनात आरोग्य कायद्यात दुरुस्ती करून सर्वत्र मलनिस्सारण व्यवस्थेच्या वाहिन्या टाकल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतTaxiटॅक्सी