कुणीही या, गोव्यात सेकंड होम घ्या!; स्थानिकांमध्ये अस्वस्थता अन् असुरक्षिततेची भावना
By किशोर कुबल | Updated: March 5, 2025 07:17 IST2025-03-05T07:16:32+5:302025-03-05T07:17:25+5:30
निसर्गरम्य, शांत व सुरक्षित प्रदेश म्हणून नावलौकिक असलेल्या गोव्यात बडे सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, सनदी अधिकारी तसेच राजकारण्यांमध्ये सेकंड होमचे कल्चर रुजतेय.

कुणीही या, गोव्यात सेकंड होम घ्या!; स्थानिकांमध्ये अस्वस्थता अन् असुरक्षिततेची भावना
किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: निसर्गरम्य, शांत व सुरक्षित प्रदेश म्हणून नावलौकिक असलेल्या गोव्यात बडे सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, सनदी अधिकारी तसेच राजकारण्यांमध्ये सेकंड होमचे कल्चर रुजतेय. त्यामुळे स्थानिकांमध्ये मात्र अस्वस्थता आहे.
गोव्यात आधीच जमिनीचा तुटवडा असताना परप्रांतीयांनी येथे येऊन जमिनी खरेदी केल्या व बंगले किंवा व्हिला बांधले तर स्थानिकांनी जायचे कुठे? अशी असुरक्षिततेची भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे.
गोव्यात यांचे बंगले, मालमत्ता
अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, अभय देओल, आफताब शिवदासानी, पूजा बेदी, प्रियांका चोप्रा. क्रिकेटपटू युवराज सिंग, अजय जडेजा, आशिश नेहरा. गोव्याचे माजी राज्यपाल मोहम्मद फझल यांचा बंगला. माजी मुख्य सचिव किरण धिंग्रा, जे. पी. सिंग यांची घरे.