पणजी : किनारपट्टीतील बेकायदा बांधकामांमध्ये चालणाऱ्या डान्स बारवर आता उत्तर गोवा पीडीए हातोडा घालणार आहे. कळंगुटमधील आणखी काही डान्स बार पीडीएच्या रडारवर आहेत. यात मून क्लबचाही समावेश आहे. डान्स बार, क्लब, पब्स, नाईट मार्केट्स, मसाज केंद्रे यामुळे खंडणीच्या विळख्यात सापडलेल्या कळंगुट, बागा किनारपट्टीत शनिवारी प्रक्षुब्ध ग्रामस्थांनी स्थानिक आमदाराला सोबत येण्यास भाग पाडून तीन डान्स बार उद्ध्वस्त केले. या घटनेची आता शासनाला दखल घ्यावी लागेल, असे दिसते. दरम्यान, पोलिसांच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ खुद्द सत्ताधारी आमदार मायकल लोबो यांनी उद्या उपोषणाची हाक दिलेली आहे. आमदार लोबो उत्तर गोवा पीडीएचे अध्यक्षही आहेत, त्यामुळे ते पीडीएचे अस्त्र उगारतील. शनिवारी प्रक्षुब्ध जमावाने ज्या तीन डान्स बारची बांधकामे पाडली त्यात खोब्रावाडा येथील क्लब अग्नीचे दहा टक्केच बांधकाम उद्ध्वस्त झालेले आहे. ते पूर्ण पाडले जाईल तसेच क्लब मूनवरही कारवाई केली जाईल. क्लब रियोमध्ये मुली नाचविल्या जातात तो प्रकार बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून (पान २ वर)
आणखी डान्स बार रडारवर
By admin | Updated: February 23, 2015 01:35 IST