शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

..आणि पाॅप स्टार रेमोने घेतली स्वतःच्या कथित निधनाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 9:18 PM

गोमंतकीय सुपुत्र आणि जागतिक किर्तीचे पाॅप स्टार रेमो फर्नांडिस यांना सोमवारी त्यांच्या स्वतःच्याच कथित निधनाच्या अफवेची दखल घ्यावी लागली. रेमोने आपल्या स्वतःच्या विशिष्ट गोंयकार शैलीत या अफवेची खिल्ली उडवली.

- सदगुरू पाटीलपणजी, दि. २५ - गोमंतकीय सुपुत्र आणि जागतिक कीर्तीचे पाॅप स्टार रेमो फर्नांडिस यांना सोमवारी त्यांच्या स्वतःच्याच कथित निधनाच्या अफवेची दखल घ्यावी लागली. रेमोने आपल्या स्वतःच्या विशिष्ट गोंयकार शैलीत या अफवेची खिल्ली उडवली. तसेच आपल्याला काहीच झालेले नसून आपण जीवंत आहोत आणि सध्या  असल्याचे रेमोने जाहीर केले.रविवारी मध्यरात्रीपासून गोव्यात रेमोच्या निधनाची अफवा पसरली. रेमोलाही अनेक गोमंतकीयानी व इतरांनी एसएमएस पाठवले व तुम्ही कसे आहात असे विचारले.सोमवारी तर कहरच झाला. रेमोच्या निधनाची अफवा वाॅट्स अॅपवर फिरू लागली. शेवटी रेमोनेच फेसबुकचे व्यासपीठ वापरून आपण जीवंत असल्याचे विनोदी शैलीत जाहीर केले. मी मलाच श्रध्दांजली वाहत होतो पण शेवटी माझ्या निधनाचे वृत्त ही फेक न्यूज असल्याचा संशय मला आला अशा शब्दांत रेमोने अफवांना पूर्ण विराम दिला. आपण सकाळी खूप भूक लागून झोपेतून उठलो आणि निधनाची ती न्यूज ही फेक न्यूज असल्याची माझी खात्री पटली. जे कधीच मला एसमएस पाठवत नव्हते त्यांनीही एसएमएस पाठविल्याबाबत धन्यवाद असे रेमोने म्हटले आहे. रेमो सध्या पोर्तोमध्ये आहे. आय एम राॅकिंग इन पोर्तो असे रेमोने जाहीर केले आहे.