..आणि पाॅप स्टार रेमोने घेतली स्वतःच्या कथित निधनाची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 21:18 IST2017-09-25T21:18:06+5:302017-09-25T21:18:19+5:30
गोमंतकीय सुपुत्र आणि जागतिक किर्तीचे पाॅप स्टार रेमो फर्नांडिस यांना सोमवारी त्यांच्या स्वतःच्याच कथित निधनाच्या अफवेची दखल घ्यावी लागली. रेमोने आपल्या स्वतःच्या विशिष्ट गोंयकार शैलीत या अफवेची खिल्ली उडवली.

..आणि पाॅप स्टार रेमोने घेतली स्वतःच्या कथित निधनाची दखल
- सदगुरू पाटील
पणजी, दि. २५ - गोमंतकीय सुपुत्र आणि जागतिक कीर्तीचे पाॅप स्टार रेमो फर्नांडिस यांना सोमवारी त्यांच्या स्वतःच्याच कथित निधनाच्या अफवेची दखल घ्यावी लागली. रेमोने आपल्या स्वतःच्या विशिष्ट गोंयकार शैलीत या अफवेची खिल्ली उडवली. तसेच आपल्याला काहीच झालेले नसून आपण जीवंत आहोत आणि सध्या असल्याचे रेमोने जाहीर केले.
रविवारी मध्यरात्रीपासून गोव्यात रेमोच्या निधनाची अफवा पसरली. रेमोलाही अनेक गोमंतकीयानी व इतरांनी एसएमएस पाठवले व तुम्ही कसे आहात असे विचारले.
सोमवारी तर कहरच झाला. रेमोच्या निधनाची अफवा वाॅट्स अॅपवर फिरू लागली. शेवटी रेमोनेच फेसबुकचे व्यासपीठ वापरून आपण जीवंत असल्याचे विनोदी शैलीत जाहीर केले. मी मलाच श्रध्दांजली वाहत होतो पण शेवटी माझ्या निधनाचे वृत्त ही फेक न्यूज असल्याचा संशय मला आला अशा शब्दांत रेमोने अफवांना पूर्ण विराम दिला. आपण सकाळी खूप भूक लागून झोपेतून उठलो आणि निधनाची ती न्यूज ही फेक न्यूज असल्याची माझी खात्री पटली. जे कधीच मला एसमएस पाठवत नव्हते त्यांनीही एसएमएस पाठविल्याबाबत धन्यवाद असे रेमोने म्हटले आहे. रेमो सध्या पोर्तोमध्ये आहे. आय एम राॅकिंग इन पोर्तो असे रेमोने जाहीर केले आहे.