आणि पहाटे तीन वाजता ब्लूमर सुटला

By Admin | Updated: December 22, 2015 01:29 IST2015-12-22T01:29:09+5:302015-12-22T01:29:36+5:30

एफसी गोवा आणि चेन्नईयन एफसी यांच्यातील फुटबॉलचा अंतिम सामना रात्री ९ वाजता संपला असला तरी त्यानंतर

And bloomer was out at three o'clock in the morning | आणि पहाटे तीन वाजता ब्लूमर सुटला

आणि पहाटे तीन वाजता ब्लूमर सुटला

 सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव
एफसी गोवा आणि चेन्नईयन एफसी यांच्यातील फुटबॉलचा अंतिम सामना रात्री ९ वाजता संपला असला तरी त्यानंतर मडगाव पोलीस स्थानकावर जो ‘सामना’ रंगला तो संपायला पहाटेचे तीन वाजले. पहाटे तीन वाजता मडगाव पोलिसांनी चेन्नईयनचा कर्णधार व मिडफिल्डर इलानो ब्लूमर याला एक लाखाच्या वैयक्तिक हमीवर मुक्त केले आणि रात्रभर चालू असलेल्या या वादावर पडदा पडला.
मडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, रात्री ११.३0 वाजता ब्लूमरला मडगाव पोलीस स्थानकात आणण्यात आले. त्यापूर्वी दोन तास पोलीस त्याची नेहरू स्टेडियमच्या ड्रेसिंग रूमबाहेर वाट पाहात होते. मात्र, दोन तास उलटले तरी हा खेळाडू बाहेर येत नसल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी, ब्लूमर शरण आला नाही तर आम्ही आत येऊन त्याला अटक करू, अशी तंबी दिल्यावर अवघ्या पाचच मिनिटांत तो बाहेर आला. (पान २ वर)

Web Title: And bloomer was out at three o'clock in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.