छत्तीसगड येथील एका इसमाची गोव्यात आत्महत्या
By सूरज.नाईकपवार | Updated: February 10, 2024 11:46 IST2024-02-10T11:45:41+5:302024-02-10T11:46:00+5:30
गेली दीड वर्षे मयत गोव्यात कामाला होता. त्याच्या कुटुंबियात फक्त एक बहिण आहे.

छत्तीसगड येथील एका इसमाची गोव्यात आत्महत्या
मडगाव: मूळ छत्तीसगड राज्यातील एका ४५ वर्षीय इसमाने दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील नाकेली लोटली येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दिलवरी सिदार असे मयताचे नाव असून, वास्को येथे एका मासेमारी बोटीवर तो कामाला होता अशी माहिती मायणा कुडतरी पोलिसांनी दिली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी वरील घटना नोंदवून घेतली आहे.
उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप पुढील तपास करीत आहेत. गेली दीड वर्षे मयत गोव्यात कामाला होता. त्याच्या कुटुंबियात फक्त एक बहिण आहे. तिच्याकडे पाेलिसांनी संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानतंर पोलिसांनी तेथे जाउन पंचनामा केला.मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातच्या शवागारात ठेवला आहे. पुढील पोलिस तपास चालू आहे.