शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बाबूशविरोधात 'आम्ही पणजीकर' पॅनल मैदानात; उत्पल, सुरेंद्र फुर्तादो, दत्तप्रसाद नाईक एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:40 IST

उत्पल पर्रीकर म्हणाले की, 'आमच्या पॅनलच्या उमेदवारांची नावे योग्यवेळी जाहीर केली जातील.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पणजी महानगरपालिकेच्या (मनपा) निवडणुकीत मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या 'टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी' या पॅनलविरोधात उत्पल पर्रीकर, दत्तप्रसाद नाईक, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, वैदेही नायक व मिनीन डिक्रुझ यांनी 'आम्ही पणजीकर' या पॅनलची घोषणा बुधवारी केली.

उत्पल पर्रीकर म्हणाले की, 'आमच्या पॅनलच्या उमेदवारांची नावे योग्यवेळी जाहीर केली जातील. आमच्या उमेदवारांविरोधात पैसा, ताकदीचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या नावांबाबत गुप्तता पाळली जात आहे. निवडणुकीचा जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध केला जाईल.

उत्पल म्हणाले, 'महापौर रोहित मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ गटाने मागील पाच वर्षांत शहरासाठी कुठलेही काम केलेले नाही. समस्या जैसे थेच आहेत. पणजीसाठी त्यांनी कधीही आवाज उठवला नाही. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्ष बाजूला ठेवून केवळ पणजीचा विचार करणारे आम्ही सर्व समविचारी लोक एकत्र आलो आहोत. 'आम्ही पणजीकर' या आमच्या पॅनलला कुठलेही चिन्ह नाही. मात्र आम्ही सर्व ३० प्रभागांमध्ये उमेदवार उभे करू, एक किंवा दोन प्रभागांमध्ये आमचे पॅनल अन्य उमेदवारांना पाठिंबा देईल. आमच्याकडे काही उमेदवार नवे तर काही जुने आहेत.'

सुरेंद्र फुर्तादो म्हणाले, 'मागील पाच वर्षात महापालिकेचे काम ठप्प झाल्यासारखेच आहे. शहराच्या नागरिकांना पाणी, कचरा आदी चांगल्या सुविधा नाहीत. आमचे पॅनल नागरिकांना चांगला पर्याय देईल. त्यासाठी आम्हाला शहरवासीयांनी साथ द्यावी.'

आमच्या उमेदवारांची सतावणूक

'आम्ही पणजीकर' पॅनलचे उमेदवार लवकरच अर्ज भरतील. त्यासाठी त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. त्यासाठी आमच्या उमेदवारांनी महापालिकेत अर्ज केला. मात्र त्यांना दाखला देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अशा पद्धतीने उमेदवारांची सतावणूक करण्यासाठी अप्रत्यक्षपणे सरकारी यंत्रणेचा वापर केला जात आहे' असा आरोप दत्तप्रसाद नाईक यांनी केला. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी एकही अर्ज सादर झाला नाही.

बाबूश पॅनेलचे उमेदवार शुक्रवारी अर्ज भरणार ?

महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या 'टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी' या पॅनेलचे उमेदवार शुक्रवारी, दि. २० रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे.

पर्रीकर माझे चांगले मित्र

'माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यात व माझ्यात राजकीय मतभेद असले तरी ते माझे नेहमीच चांगले मित्र होते' असे सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले. ते म्हणाले की, पर्रीकर यांनी मी महापौर असताना महापालिकेच्या नव्या इमारतीचे बांधकाम करू असे सांगितले होते. आमचे पॅनल निवडून आले तर नवी इमारत उभारली जाईल.'

त्यांना कोण रोखत आहे?

'पणजी महापालिका निवडणुकीत आपल्या पॅनलचे उमेदवार सर्व ३० प्रभागांमध्ये निवडून येतील असे विधान महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केले आहे. पण जर तसे असेल तर त्यांनी अजूनही आपल्या पॅनलच्या उमेदवारांची नावे जाहीर का केलेली नाहीत? त्यांना तसे करण्यापासून कोण रोखत आहे? असा सवाल उत्पल यांनी केला.

'आम्ही पणजीकर' पॅनलला काँग्रेसचा पाठिंबा : पाटकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पणजी महानगरपालिकेसाठी उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील 'आम्ही पणजीकर' पॅनलला पक्षाचा पाठिंबा असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. पाटकर म्हणाले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक प्रशासनासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 'आम्ही पणजीकर' पॅनलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरासमोरील पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व पर्यावरण यांसारख्या अनेक प्रश्नांवर ठोस काम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. उत्पल यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल शहरात स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत आहे. पारदर्शक व जबाबदार कारभाराचे आश्वासन देत आहेत. काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने या पॅनलला राजकीय बळ देईल. आम्ही आमच्या काही युवा उमेदवारांची नावे त्यांना दिली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Babush faces challenge: 'Aami Panajikar' panel enters Panjim election.

Web Summary : Utpal Parrikar and others announced 'Aami Panajikar' against Babush Monserrate in Panjim. They allege the ruling group failed Panjim. Congress supports Parrikar's panel.
टॅग्स :goaगोवाUtpal Parrikarउत्पल पर्रिकरBJPभाजपाElectionनिवडणूक 2026