अमेय अभ्यंकर यांची उचलबांगडी

By Admin | Updated: December 14, 2015 01:14 IST2015-12-14T01:14:03+5:302015-12-14T01:14:39+5:30

पणजी : प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून पर्यटन संचालकपदावरून आयएएस अधिकारी अमेय अभ्यंकर यांची

Amey Abhyankar's pick | अमेय अभ्यंकर यांची उचलबांगडी

अमेय अभ्यंकर यांची उचलबांगडी

पणजी : प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून पर्यटन संचालकपदावरून आयएएस अधिकारी अमेय अभ्यंकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. महिला बालकल्याण खात्याच्या संचालक दीपाली नाईक यांची बदली मुरगाव मुख्याधिकारीपदी करण्यात आली आहे. नऊ जणांच्या बदल्या बढत्या देऊन करण्यात आल्या आहेत. शनिवारी सुट्टीच्या दिवशी तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
महिला बालकल्याण खात्याच्या संचालकपदी आयएएस अधिकारी शिल्पा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभ्यंकर यांना माहिती तंत्रज्ञान खात्याच्या संचालकपदी नियुक्त केले आहे.
मडगावचे मुख्याधिकारी यशवंत तावडे यांची दक्षिण जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ या पदी, उत्तर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघनाथ परोब यांची लघुबचत व लॉटरी संचालकपदी, गोवा राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव सिध्दिविनायक नाईक यांची मडगाव पालिका मुख्याधिकारीपदी, हस्तकला खात्याचे संचालक दामोदर मोरजकर यांची फोंडा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी, गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा संयुक्त सचिव एन. पी. शिंगणापूरकर यांची कला अकादमीच्या सदस्य सचिवपदी बदली केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Amey Abhyankar's pick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.