राज्यात पाण्याची पर्यायी व्यवस्था
By Admin | Updated: November 24, 2015 01:28 IST2015-11-24T01:28:28+5:302015-11-24T01:28:39+5:30
डिचोली/पणजी : तिळारीच्या कालव्यामधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे; पण सरकारने चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा

राज्यात पाण्याची पर्यायी व्यवस्था
डिचोली/पणजी : तिळारीच्या कालव्यामधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे; पण सरकारने चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा प्रकल्पाकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या कोठेही गंभीर झालेली नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी पणजी येथे पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, की दरवर्षी नोव्हेंबरमध्ये एक महिन्यासाठी तिळारीच्या पाण्याचा पुरवठा बंद होत असतो. त्या वेळी कालव्यांचे दुरुस्ती काम चालत असते. या वेळी २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीसाठी पाणीपुरवठा थांबविला आहे. तिळारीचे पाणी हे चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा प्रकल्पासाठी गरजेचे असते. तिळारीचे पाणी थांबल्यानंतर चांदेल प्रकल्पासाठी बाजूच्याच नदीचे पाणी खेचून घेण्यात आले. मात्र, अस्नोडासाठी तशी व्यवस्था झाली नव्हती. ती आता होत आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की अस्नोडा प्रकल्पाची गरज ११० एमएलडी आहे; पण तेथील नदीतून फक्त ८० एमएलडी पाणी मिळते. यावर उपाय म्हणून आमठाणे-साळ येथील धरणातील पाणी अस्नोडा येथे आणण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाण्याविषयी राज्यात कोठे विदारक स्थिती आहे असा विषय नाही.
(खास प्रतिनिधी)