शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सुदिन ढवळीकर यांच्यासह श्रीपाद नाईक यांनाही होती 'सीएम' होण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:02 IST

गोविंद गावडे यांनी ढवळीकर यांच्या विषयी विधान केल्यानंतर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात व भाजपमध्ये जुन्या आठवणी आता ताज्या झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्वर्गीय मनोहर पर्रीकर हे अत्यंत आजारी होते, तेव्हा केवळ सुदिन ढवळीकर यांनाच नव्हे, तर श्रीपाद नाईक यांना देखील मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती. मात्र, त्यावेळच्या काही मंत्री, आमदारांच्या विरोधामुळेच ती संधी हुकली. गोविंद गावडे यांनी ढवळीकर यांच्या विषयी विधान केल्यानंतर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात व भाजपमध्ये जुन्या आठवणी आता ताज्या झाल्या आहेत.

पर्रीकर जेव्हा मुंबईच्या इस्पितळात उपचार घेत होते, त्यावेळी भाजपच्या त्यावेळच्या कोअर टीमने पर्रीकर यांना सल्ला दिला होता. तो असा की, विधानसभेच्या बजेट अधिवेशनाला तुम्ही येऊ नका. तुम्ही बजेटचा काही भाग ढवळीकर यांच्याकडे सोपवा आणि ढवळीकर यांनाच दोन-तीन पाने अधिवेशनात वाचून दाखवू दे. त्यावेळी पर्रीकर मंत्रिमंडळात ढवळीकर हे ज्येष्ठ मंत्री असल्याने त्यांनी बजेट वाचण्याचा सोपस्कार पार पाडू दे, असे पर्रीकर यांना सुचविले गेले होते. मात्र, त्यावेळी पर्रीकर यांना त्यांच्या अत्यंत जवळच्या काही मित्रांनी वेगळा सल्ला दिला. हे मित्र भाजपमध्ये नव्हते.

पण ते पर्रीकर यांचे जानी दोस्त होते. त्यात काही वकील व डॉक्टर होते. त्यापैकी काहींनी पर्रीकर यांना सुचविले की, तुम्हीच अचानक गोव्यात जावे आणि बजेट वाचून दाखवावे. त्यावेळी पर्रीकर यांना मुंबईच्या इस्पितळातील डॉक्टरांनी गोव्यात जाऊ नका, असे सांगितले होते. पण, पर्रीकर अचानक गोव्यात आलेच. पर्रीकर गोव्यात येतील हे पर्रीकर यांचे बंधू अवधूत पर्रीकर किंवा पक्षाचे खजिनदार संजीव देसाई यांनाही ठाऊक नव्हते. संजीव देसाई तेव्हा इस्पितळात पर्रीकर यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते. त्या सर्वांना चकवा देऊन पर्रीकर गोव्यात परतले व त्यांनी आपणच बजेट वाचून दाखवले होते. याबाबतचा उल्लेख देखील 'अॅन एक्स्ट्राऑर्डीनरी लाइफ' पुस्तकात आलेला आहे.

मुख्यमंत्रिपद चालून आले होते, पण...

आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पर्रीकर कांदोळीच्या इस्पितळात पोहचले होते. तिथे त्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली व सुदिन ढवळीकरांना बोलावून घेतले. २०१७ साली गोव्यात आघाडी सरकार स्थापन झाले होते. पर्रीकरांना सरकार टिकविताना कसरत करावी लागली होती.

विजय सरदेसाई, गोविंद गावडे, रोहन खंवटे, सुदिन ढवळीकर यांच्यावरच सरकार अवलंबून होते. पर्रीकर यांनी सरकारमध्ये समन्वय राखण्यासाठी मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे सोपवतो, असे ढवळीकर यांना सांगितले होते. ढवळीकर खुश झाले होते. त्यानंतर पर्रीकरांनी सरदेसाई व गावडेंना इस्पितळात बोलावून हे सांगितले. मात्र त्यांनी ढवळीकर यांना आक्षेप घेतला, मग तो प्रस्ताव बारगळला.

त्यापूर्वी भाजपच्या गोवा टीमने श्रीपाद नाईक यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे केले होते. कारण, पर्रीकर आजारी असल्याने सरकारचा कारभार चालतच नव्हता. काही आयएएस अधिकारी त्याकाळी राजा बनले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यावेळी गोवा भाजपला श्रीपाद नाईक यांचे नाव सुचविले होते. श्रीपाद नाईक तयारही झाले होते. नाईक मुख्यमंत्री होऊ शकतात याची कल्पना त्यावेळी खंवटे, सरदेसाई व अन्य काही नेत्यांना आली, त्यांनी आम्हाला श्रीपाद नाईक देखील नको, पर्रीकरच हवे असा मुद्दा मांडला व मग तो विषयही तिथेच संपला होता. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा