किनाऱ्यांवर हंगामी बांधकामांना परवानगी द्या - गोव्याची केंद्राकडे मागणी
By Admin | Updated: July 18, 2016 21:14 IST2016-07-18T21:14:36+5:302016-07-18T21:14:36+5:30
किनाऱ्यांवर हंगामी बांधकामांसाठी परवानगी दिली जावी, अशी मागणी गोवा सरकारने केंद्राकडे केलेली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन राज्यमंत्री अनिल माधव दवे यांनी

किनाऱ्यांवर हंगामी बांधकामांना परवानगी द्या - गोव्याची केंद्राकडे मागणी
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १८ - किनाऱ्यांवर हंगामी बांधकामांसाठी परवानगी दिली जावी, अशी मागणी गोवा सरकारने केंद्राकडे केलेली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन राज्यमंत्री अनिल माधव दवे यांनी राज्यसभेत एका प्रश्नावर लेखी उत्तरात दिली.
शॅक व्यावसायिकांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राकडे हे साकडे घातले आहे. गोव्यातील किनाऱ्यांवर शॅक उभारुन पर्यटकांची भोजन, खाद्यपदार्थांची सोय केली जाते. जून ते आॅगस्ट या काळात किनाऱ्यांवर हंगामी बांधकामांनाही परवानगी नसते त्यामुळे शॅक काढावे लागतात. राज्यात पारंपरिक मच्छिमारांची घरे किनाऱ्यांवर आहेत त्यांना बांधकामाच्या बाबतीत अडचणी येऊ नयेत यासाठी कायद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे.