शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

पावसाळी अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार

By किशोर कुबल | Updated: June 14, 2024 14:46 IST

येत्या १५ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन जाहीर झालेले आहे. या पार्श्वभूमीवर युरी यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सावंत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे.

पणजी : विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची सांगितले. रणनीती ठरवण्यासाठी लवकरच विरोधी आमदारांची लवकरच संयुक्त बैठक बोलावली जाईल.

येत्या १५ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन जाहीर झालेले आहे. या पार्श्वभूमीवर युरी यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सावंत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे. म्हादईचा प्रश्न अजून सुटलेल्या नाही. वाढती बेरोजगारी, महागाई नियंत्रणात येऊ  शकलेली नाही. भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. या सर्व प्रश्नांवर विरोधक एकत्रपणे सरकारला घेरणार आहे.युरी म्हणाले की, आता निवडणुका झालेल्या आहेत. जनतेने कौल दिलेला आहे.

दक्षिण गोव्यातील पराभवाने लोकांची सरकारप्रती नाराजी दिसून आलेली आहे. विरोधक म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो. परंतु सरकार ते गंभीरपणे घेत नाही. दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. जाती, धर्माच्या प्रश्नावर मतदारांमध्ये फूट पाडण्याचे दिवस आता गेले. लोकांनी भाजपला जागा दाखवून दिलेली आहे.'युरी पुढे म्हणाले की,' सर्वसामान्य जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचतच नाहीत. राज्याची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. हे सरकार खाण व्यवसाय सुरू करू शकलेले नाही. भाजपने हुकुमशाही, दादागिरीची भाषा आरंभल्यानेच दक्षिण गोव्यातील लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

युरी म्हणाले की, ' गेल्या विधानसभा अधिवेशनाच्यावेळी चुकीचा पायंडा घालण्यात आला. पाच वर्षांपेक्षा अधिक जुनी माहिती दिली जाणार नाही,असे  जाहीर करण्यात आले. आरटीआय अर्ज केला तरी जुनी माहिती मिळते. त्यामुळे विधानसभेतच पाच वर्षांपूर्वीची माहिती का मिळू नये? विरोधी व सत्ताधाऱ्यांना प्रश्नोत्तराच्या तासाला समान संधी मिळाली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. या सर्व गोष्टी आम्ही सभापतींच्या निदर्शनास आणून देणार आहोत.'

युरी म्हणाले की, लोकांनाही आज सर्व विरोधक एकत्र आलेले हवे आहेत. विरोधी आमदारांमध्ये मतभिन्नता असू शकते. परंतु ती तात्पुरती बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सर्व विरोधी आमदारांनी एकत्र येणे गरजेचे आहे व त्यासाठी संयुक्त रणनीतीही ठरवावी लागेल. लवकरच बैठकीत ती ठरवली जाईल.'

टॅग्स :goaगोवा